Maharashtra Police Bharti 2024 Physical Test Details

Maharashtra Police Bharti 2024 Physical Test Details

महाराष्ट्र राज्याची पोलीस भरती २०२४ साठीची अधिसूचना आली आणि अनेक तरुण-तरुणींना पोलीस होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी संधी मिळाली.

या भरतीसाठी अनेकांप्रमाणे आपणही तयारी करत असाल किंवा तयारी करायची असेल तर आपल्याला भरती मध्ये घेतल्या जाणाऱ्या शारीरिक चाचणी विषयीही माहिती असणे आवश्यक आहे.

म्हणूनच या पोस्ट मध्ये आपण Maharashtra Police Bharti 2024 Physical Test Details विषयी माहिती घेणार आहोत. पण शारीरिक चाचणी कशी असते हे समजून घेण्याआधी शारीरिक पात्रता समजून घेणे आवश्यक आहे. 

(शारीरिक पात्रता) Maharashtra Police Bharti Physical Eligibility

पोलीस भरतीमध्ये पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी पोलीस शिपाई या पदासाठी उंचीचे निकष पुढीलप्रमाणे.

महिला (Female) : महिला उमेदवारांची कमीत कमी उंची ही 155 CM इतकी असावी

पुरुष (Male) : पुरुष उमेदवारांची कमीत कमी उंची ही 165 CM इतकी असावी.

छाती

पुरुष : पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.

महिला : महिलांसाठी लागू नाही.

हे पण वाचा : Maharashtra Police Ranks List

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा कशी होईल ?

शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये किमान 50 टक्के गुण मिळालेल्या उमेदवारांनाच लेखी परीक्षा देता येणार आहे , परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. ही परीक्षा मराठी मधून घेण्यात येत असते. लेखी परीक्षा ही शंभर गुणांची असून त्यासाठी उमेदवारांना 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो.

उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेमध्ये यापेक्षा कमी गुण मिळवलेले उमेदवार भरतीसाठी अपात्र समजले जातील.

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम आणि त्यासाठी गुणांची विभागणी खालीप्रमाणे असते.

  • अंकगणित : 25 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी : 25 गुण
  • बुद्धिमत्ता चाचणी : 25 गुण
  • मराठी व्याकरण : 25 गुण
  • एकूण : 100 गुण

पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी कशी असेल ?

शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदींनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची शारीरिक चाचणी ही 50 गुणांची असेल.

पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

पोलीस भरती शारीरिक चाचणी : पुरुष

  • 1600 मीटर धावणे : 20 गुण
  • 100 मीटर धावणे : 15 गुण
  • गोळा फेक : 15 गुण
  • एकूण : 50 गुण

पोलीस भरती शारीरिक चाचणी : महिला 

  • 800 मीटर धावणे : 20 गुण
  • 100 मीटर धावणे : 15 गुण
  • गोळा फेक : 15 गुण
  • एकूण : 50 गुण

या पोस्टमधील Maharashtra Police Bharti 2024 Physical Test Details विषयीची हि माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. भरतीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !

पोलीस भरती संदर्भात इतर महत्वाच्या पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या