महिला पोलीस भरती ग्राउंड टेस्ट कशी असते ? कोण - कोणते इव्हेंट असतात ?

महिला पोलीस भरती ग्राउंड टेस्ट कशी असते

काही मुलींना पोलीस होण्याची खूप इच्छा असते पण अनेक वेळेस काही मुली घरातील व्यक्तींचा पाठिबा नाही किंवा पुरेसी तयारी नाही यासारख्या कारणांमुळे भरतीसाठी फॉर्म भरून सुद्धा पोलीस बनू सकत नाही.

पोलीस भरतीसाठी महिलांची ग्राउंड टेस्ट कशी असते? हेच अनेक वेळेस माहिती नसते आणि त्यामुळे तयारीमध्ये कमतरता जाणवते.

म्हणूनच महिला पोलिसांची भरती घेतली जात असताना ग्राउंड टेस्ट कसी असते आणि कोणत्या इव्हेंटला किती गुण असतात याबाबतची माहिती या पोस्ट मध्ये देण्याचा प्रयत्न करीत आहे.

शिवाय पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तके वाचावीत यासाठी आपण खालील पोस्ट वाचू सकता.

हे पण बघा : पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तके वाचावीत ?

महिला पोलीस भरती ग्राउंड गुण विभागणी

पोलीस भरतीसाठी घेतली जाणारी ग्राउंड टेस्ट ही पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी असते. महिलांची टेस्ट कशी असते ते आपल्याला खाली दिलेल्या माहितीवरून समजेल.

महिला उमेदवारांची ग्राउंड मध्ये एकूण 50 गुणांसाठी 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक हे 3 इव्हेंट घेतले जात असतात. त्यांची गुणदान पद्धती खालीलप्रमाणे असते.

800 मीटर धावणे

800 मीटर धावणे किती वेळेत पूर्ण केल्यास किती गुण दिले जातात याबद्दल माहिती खाली देण्यात आलेली आहे. हे  अंतर पूर्ण करताना जर आपण 4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतला तर आपल्याला कोणतेही गुण मिळणार नाहीत आणि 2 मिनिट 50 सेकंदांपेक्षा कमी वेळ घेतल्यास पूर्ण 20 गुण दिले जातील.

 • 2 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 20 गुण
 • 2 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 18 गुण
 • 3 मि. 00 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी  - 16 गुण
 • 3 मि. 10 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 3 मि. 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 14 गुण
 • 3 मि.20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 12 गुण
 • 3 मि.30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 40 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 10 गुण
 • 3 मि.40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 08 गुण
 • 3 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मि. 00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 05 गुण
 • 4 मि.00 सेकंदापेक्षा जास्त - 0 गुण

100 मीटर धावणे

100 मीटर धावण्यासाठी आपण 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ घेतल्यास आपल्याला पूर्ण 15 गुण दिले जातील, तर याउलट 20 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतल्यास एकही गुण मिळणार नाही. या बद्दलची गुण विभागणी खालीलप्रमाणे असते.

 • 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 15 गुण
 • 14 सेकंदापेक्षा जास्त परंतू 15 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 12 गुण
 • 15 सेकंदापेक्षा जास्त परंतू 16 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 10 गुण
 • 16 सेकंदापेक्षा जास्त परंतू 17 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 08 गुण
 • 17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 06 गुण
 • 18 सेकंदापेक्षा जास्त परंतू 19 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 04 गुण
 • 19 सेकंदापेक्षा जास्त परंतू 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी - 01 गुण
 • 20 सेकंदापेक्षा जास्त - 0 गुण

गोळाफेक

गोळाफेकीसाठी खालीलप्रमाणे गुण विभागणी करण्यात आलेली आहे.

 • 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त - 15 गुण
 • 5.50 मीटर किंवा जास्त परंतू 6 मीटरपेक्षा कमी - 12 गुण
 • 5 मीटर किंवा जास्त परंतू 5.50 मीटरपेक्षा कमी - 10 गुण
 • 4.50 मीटर किंवा जास्त परंतू 5 मीटरपेक्षा कमी - 05 गुण
 • 4 मीटर किंवा जास्त परंतू 4.50 मीटरपेक्षा कमी - 03 गुण
 • 4.50 मीटर पेक्षा कमी - 0 गुण

वरील सर्व माहितीवरून महिला पोलीस भरती ग्राउंड टेस्ट कशी असते? कोण-कोणते इव्हेंट असतात? इत्यादी प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळाली असतील.

हे पण बघा : महिला पोलीस भरती संपूर्ण माहिती

हे पण बघा : पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या