महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपण अर्ज करणार असाल तर आपल्याला त्यासाठी आवश्यक शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता माहित असणे आवश्यक आहे. या पात्रतेविषयी माहिती देत आहे यामध्ये काही बदल झाल्यास आपल्याला अपडेट देऊच.
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कोणती आहे ?
पोलीस शिपाई या पदाच्या भरतीसाठी उमेदवार हा 12 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच जर आपल्याला पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना (License) असणे आवश्यक आहे.
पोलीस भरतीच्या शारीरिक परीक्षेचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
हे पण वाचा : पोलीस भरतीसाठी पुस्तके
हे पण वाचा : पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
पोलीस भरतीसाठी उंची किती लागते ?
पोलीस भरतीमध्ये पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी उंचीचे निकष पुढीलप्रमाणे.
महिला (Female) : महिला उमेदवारांची कमीत कमी उंची ही 155 CM इतकी असावी
पुरुष (Male) : पुरुष उमेदवारांची कमीत कमी उंची ही 165 CM इतकी असावी.
छाती
पुरुष : पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला : महिलांसाठी लागू नाही.
हे पण वाचा : Maharashtra Police Ranks List
महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा कशी होईल ?
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी उमेदवारांना सर्वप्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल, परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. ही परीक्षा मराठी मधून घेण्यात येत असते. लेखी परीक्षा ही शंभर गुणांची असून त्यासाठी उमेदवारांना 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो.
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेमध्ये कमी गुण मिळवलेले उमेदवार भरतीसाठी अपात्र समजले जातील.
पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम आणि त्यासाठी गुणांची विभागणी खालीप्रमाणे असते.
- अंकगणित : 20 गुण
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी : 20 गुण
- बुद्धिमत्ता चाचणी : 20 गुण
- मराठी व्याकरण : 20 गुण
- मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम : 20 गुण
- एकूण : 100 गुण
पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी कशी असेल ?
नविन नियमानुसार लेखी परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांनाच शारीरिक चाचणी देता येईल. शारीरिक चाचणी ही 50 गुणांची असेल, तसेच शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची चाचणी घेण्यात येईल.
पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
पोलीस भरती शारीरिक चाचणी : पुरुष
- 1600 मीटर धावणे : 30 गुण
- 100 मीटर धावणे : 10 गुण
- गोळा फेक : 10 गुण
- एकूण : 50 गुण
पोलीस भरती शारीरिक चाचणी : महिला
- 800 मीटर धावणे : 30 गुण
- 100 मीटर धावणे : 10 गुण
- गोळा फेक (4 किलो) : 10 गुण
- एकूण : 50 गुण
महाराष्ट्र पोलीस भरती वयोमर्यादा
कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 28 वर्षे वय असणारे उमेदवार पोलीस भरतीसाठी पात्र असतील; परंतु काही घटकांना वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे असेल.
- खुला प्रवर्ग : 18 ते 28 वर्षे
- मागास प्रवर्ग : 18 ते 33 वर्षे
- प्रकल्पग्रस्त उमेदवार : 18 ते 45 वर्षे
- माजी सैनिक : सेवेतील कालावधी अधिक तिन वर्षे इतकी सूट
- अनाथ उमेदवार : 18 ते 33 वर्षे
- भूकंपग्रस्त उमेदवार : 18 ते 45 वर्षे
- खेळाडू : 18 ते 33 वर्षे
- पोलीस पाल्य : 18 ते 33 वर्षे
- गृहरक्षक (Home Guard) : 18 ते 33 वर्षे
- महिला उमेदवार : 18 ते 33 वर्षे
0 टिप्पण्या