महिला पोलीस भरती विषयी माहिती समजून घ्या (Maharashtra Police Constable)

महिला पोलीस भरती विषयी माहिती

आपल्याला पोलीस व्हायचे आहे आणि आपल्याला काय करावे हे समजून घ्यायचे असेल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. कारण या ठिकाणी आपण महिला पोलीस भरती विषयी माहिती समजून घेणार आहोत.

तसं लहान असताना आपल्याला पोलिसांचं विशेष असं आकर्षण असतं, त्यांच्या वर्दीकडे बघून काही वेळा भीतीही वाटली असेल. पण तरीही मी मोठे झाल्यावर पोलीस होणार असे सांगत असतो. असे सांगणाऱ्या अनेकांपैकी मोठे झाल्यावर मात्र काही व्यक्तीच पोलीस होत असतात.

असो महिलांसाठी पोलीस होण्यासाठी काय करावे याबद्दल इंटरनेटवर खूपच कमी माहिती उपलब्ध आहे म्हणूनच येथे आपण जास्तीत जास्त प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

महिला पोलीस भरती साठी काय करावे

महिलांना पोलीस खात्यामध्ये भरती होण्यासाठी पुरुषांप्रमाणेच परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावे लागतात, त्यानंतर भरतीची पुढील प्रक्रिया जसे की मैदानी चाचणी, लेखी परीक्षा इ. होते.

पोलीस होण्यासाठी आपल्याकडे काही पात्रता असणे आवश्यक आहे, जे आपण पुढे नीट समजून घेणार आहोत. शिवाय आपल्याला लेखी परीक्षेचा आणि मैदानी चाचणीचाही चांगला अभ्यास करावा लागेल. कारण अभ्यास कमी पडला तर स्पर्धेमध्ये मागे राहाल.

महिला पोलीस भरतीसाठी शिक्षण किती असावे

महिला पोलिस होण्यासाठी आपल्याला किमान बारावी पास असणे आवश्यक आहे, त्याशिवाय भरती परीक्षेला बसता येत नाही. आपला बारावीला एखादा विषय जरी गेला असेल तरी आपण भरतीसाठी अपात्र ठरता.

मात्र आपण आपण बारावीला एकाच प्रयत्नात पास झाले नसाल, म्हणजेच काही विषय गेल्याने परत परीक्षा देऊन पास झाला असाल तरीही आपल्याला ही भरती परीक्षा देता येते.

महिला पोलीस भरती उंची किती लागते

पोलीस भरतीसाठी पात्र होण्यासाठी महिला उमेदवारांची उंची ही किमान 155 CM असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी उंची असेल तर आपल्याला मैदानी चाचणीमधून बाहेर केले जाईल.

जर आपली उंची लहानपणापासून थोडीसी कमी असेल तर आधीपासूनच उंची वाढीसाठी उपयुक्त असा व्यायाम चालू करणे फायदेशीर ठरू शकते.

हे पण बघा : पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तके वाचावीत ?

महिला पोलीस भरतीसाठी वजन किती लागते

पोलीस भरतीमध्ये उंची आणि इतर मैदानी पात्रता पूर्ण करणे आवश्यक असते. आपल्याला पोलीस भरतीसाठी  किमान वजन विचारले गेलेले नाही.

तरीही जर आपले वजन उंचीच्या तुलनेत कमी असेल तर आपल्या वजनात थोडा वाढ करण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपल्याला मैदानी चाचणी सहजतेने पूर्ण करण्यास मदत होईल. वजन कमी असल्यास लवकर थकवा जाणवतो, तो जाणवणार नाही.

Mahila police bharti ground test

महिला पोलीस भरती ग्राउंड

पोलीस भरती ग्राउंड म्हणजेच मैदानी चाचणी. या मैदानी चाचणीमध्ये 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक असे तिन इव्हेंट एकूण 50 गुणांसाठी घेतले जातात. यासाठीची गुण विभागणी खालीलप्रमाणे असते.

पोलीस भरती शारीरिक चाचणी : महिला 

 • 800 मीटर धावणे : 20 गुण
 • 100 मीटर धावणे : 15 गुण
 • गोळा फेक : 15 गुण
 • एकूण : 50 गुण

हे पण बघा : महिला पोलीस भरती ग्राउंड टेस्ट कशी असते ?

पोलीस भरती लेखी परीक्षा कशी असते

पोलीस भरतीसाठी अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण इत्यादी विषयांवर आधारित 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. 

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम आणि त्यासाठी गुणांची विभागणी खालीप्रमाणे असते.

 • अंकगणित : 20 गुण
 • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी : 20 गुण
 • बुद्धिमत्ता चाचणी : 20 गुण
 • मराठी व्याकरण : 20 गुण
 • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम : 20 गुण
 • एकूण : 100 गुण

पोलीस भरती ट्रेनिंग मुली

आपण पोलीस भरतीची तयारी स्वत:च करत असाल तर वर दिलेला लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मैदानी चाचणीचे इव्हेंट यांचे ताळमेळ बसवून ट्रेनिंग सुरु करू शकता.

किंवा जर आपल्या जवळ एखादी ट्रेनिंग देणारी अकॅडमी असेल तर ती जॉईन करून सराव करू सकता.

मात्र नसेलच तर मैदानी चाचणीसाठी सकाळ-संध्याकाळ धावणे आणि गोळाफेकीचा सराव करा आणि इतर वेळेत लेखी परीक्षेसाठी अभ्यास करा.

मात्र हे करत असताना गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून एक वेळापत्रक तयार करून घ्या. कोणत्या दिवशी कोणता विषय अभ्यास करणार आहात ते ठरवा एकाच दिवशी दोन पेक्षा जास्त विषय घेऊ नका.

महाराष्ट्र पोलीस भरती वयोमर्यादा

कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 28 वर्षे वय असणारे उमेदवार पोलीस भरतीसाठी पात्र असतील; परंतु काही घटकांना वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे असेल.

 • खुला प्रवर्ग : 18 ते 28 वर्षे
 • मागास प्रवर्ग : 18 ते 33 वर्षे
 • प्रकल्पग्रस्त उमेदवार : 18 ते 45 वर्षे
 • माजी सैनिक : सेवेतील कालावधी अधिक तिन वर्षे इतकी सूट
 • अनाथ उमेदवार : 18 ते 33 वर्षे
 • भूकंपग्रस्त उमेदवार : 18 ते 45 वर्षे
 • खेळाडू : 18 ते 33 वर्षे
 • पोलीस पाल्य : 18 ते 33 वर्षे
 • गृहरक्षक (Home Guard) : 18 ते 33 वर्षे
 • महिला उमेदवार : 18 ते 33 वर्षे

पोलीस भरती झाल्यानंतर प्रशिक्षण कसे असते?

पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई म्हणून निवड झाल्यानंतर प्रशिक्षण दिले जाते. दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा कालावधी साधारणपणे 10 महिने असतो.

या प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना मैदानी सराव/व्यायाम, परेड, कायद्याची ओळख इत्यादिसोबातच पोलीस व समाजामधील संबंध कसे असायला हवेत यासाठी सुध्दा प्रशिक्षण दिले जाते.

या पोस्ट मध्ये दिलेली महिला पोलीस भरती विषयीची माहिती आपल्यासाठी ठरली असेल तर असाच पोस्ट साठी पुन्हा आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि आपल्या मैत्रिणींसोबत ही माहिती शेयर करा. आपल्याला पोलीस भरतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या