पोलीस भरती साठी कोणती पुस्तके वाचावी ?
पोलीस भरतीची तयारी अनेक विद्यार्थी करत असतात मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये पोलीस भरतीची ओढ जास्त असल्याचे बघायला मिळते. अनेक विद्यार्थ्यांना लहानपणापासून पोलीस बनण्याची इच्छा असते तर काही विद्यार्थ्यांना बारावी पास आहे व सरकारी नोकरी पाहिजे म्हणूनही पोलीस भरतीची तयारी करताना दिसून येतात.आपणही पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा कुणाला करायला लावत असाल म्हणूनच ही पोस्ट वाचत आहात.
हे पण वाचा : Police Inspector होण्यासाठी ही पुस्तके एकदा तरी नक्की वाचायला हवीत
हे पण वाचा : महाराष्ट्र पोलीस रँक्स विषयी माहिती
पोलीस भरतीची तयारी करताना अनेकांना कोणती पोलीस भरती पुस्तके वाचावीत हा प्रश्न पडत असतो. आपल्यालाही असाच प्रश्न पडला असेल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात कारण या पोस्ट मध्ये पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तके वाचावी या प्रश्नाचे उत्तर शोधून आपल्याला काही चांगली आणि अनेकांच्या विश्वासावर खरी उतरणारी पुस्तकांची नावे देणार आहे.
नक्की वाचा : स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी आवश्यक का आहे?
पोलीस भरती पुस्तके
येथे दिलेली सर्व पुस्तके Amazon वर उपलब्ध आहेत आपल्याला हवी असल्यास क्लिक करून मागवू शकता.
Siddheshvar Hadbe's 40000+ Jumbo Mega Police Bharati
शिद्धेश्वर यांची ही पुस्तक लेखी परीक्षेच्या सरावासाठी खूप चांगली पुस्तक आहे यामध्ये आपल्याला अनेक प्रश्न हे घटकांमध्ये विभागलेले बघायला मिळतात त्यामुळे आपल्याला ज्या घटकाचा सराव करायचा असेल त्यानुसार सराव करणे सोपे होते.
नोबल मेगा महापोर्टल पोलीस भरती संभाव्य 257 प्रश्नपत्रिका संच
अनेकांच्या पसंतीस आलेली नोबल मेगा च्या सिरीज मधील ही एक पुस्तक आहे यामध्ये आपल्याला 257 संभाव्य प्रश्नपत्रिका संच देण्यात आलेले आहेत त्यामुळे सरावासाठी याचा उपयोग करता येणार आहे.
तात्यांचा ठोकळा
तात्यांचा हा ठोकला पोलीस भरती साठी वापरता येईल. यामध्ये आपल्याला घटकांप्रमाणे वर्गीकृत केलेले विश्लेषण मिळणार आहे. ही पुस्तक आपल्याला पोलीस भरती शिवाय MPSC च्या PSI | STI | ASO, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य यांच्यासोबत इतर स्पर्धा परीक्षासाठीही उपयोगात आणता येईल.
सुगम मराठी व्याकरण व लेखन - मो. रा. वाळंबे
मो. रा. वाळंबे यांची ही मराठी व्याकरणाची पुस्तक आपल्याला फक्त पोलीस भरतीच नाही तर इतरही स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी ठरेल. यामध्ये आपल्याला व्याकरण सविस्तपणे समजविण्यात आलेले आहे. ही पुस्तक सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाकडे ही पुस्तक असावीच.
संपूर्ण इंग्रजी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
इंग्रजी व्याकरणासाठी ही पुस्तक खूप उपयोगी आहे. बाळासाहेबांची ही पुस्तक पोलीस भरती सोबतच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगात घेता येईल. इंग्रजी व्याकरणासाठी इतरही पोलीस भरती पुस्तके आहेत पण मी आपल्याला ही पुस्तक घेण्याचा सल्ला देईन.
Fastrack Maths
गणिताचा अभ्यास करण्यासाठी प्रा. सतीश वसे यांची Fastrack Maths खूप चांगली पुस्तक आहे. आपण पोलीस भरतीच्या गणिताची तयारी करण्यासाठी या पुस्तकाचा नक्की वापर करावा. ही पुस्तक सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगात घेता येईल.
फास्ट्रॅक बुध्दिमत्ता
या पुस्तकाचा वापर आपल्याला बुद्धिमत्तेची तयारी करण्यासाठी करता येईल. या पुस्तकात आपल्याला अनेक उदाहरण सोडवून दाखविण्यात आलेले आहेत. ही पुस्तक पोलीस भरतीसाठी आपण नक्की अभ्यासावी. ही पुस्तक आपण खरेदी केल्यास आपल्याला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगात घेता येईल.
पोलीस भरती साठी कोणती पुस्तके वाचावी ? या प्रश्नाचे उत्तर या पोस्ट मधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे वरील पैकी कोणतीही पोलीस भरती पुस्तके हवी असल्यास आपण पुस्तकावर किंवा नावावर क्लिक करून ऑर्डर करू शकता. या यादीमध्ये अजून एखादी पुस्तक असायला हवी असे आपल्याला वाटत असेल तर कमेंट करून कळवा मी त्या पुस्तकाचा समावेश या यादीमध्ये करण्याचा प्रयत्न करेन.
ही पोस्ट आपल्यासाठी किती उपयोगात आली आणि पोस्ट कशी वाटली हे कमेंट करून मला कळवा, तसेच काही प्रश्न किंवा सल्ला असल्यास तेही कमेंट करा. आपले कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत, कारण आपल्या कमेंट आणि ब्लॉगला दिलेल्या भेटीमुळेच मला नविन पोस्ट लिहिण्याचे प्रोत्साहन मिळते.
0 टिप्पण्या