MPSC PSI Books in Marathi
ग्रामिण भागात तर पोलिस होण्याची इच्छा असणारे अनेक मुलं / मुली मिळतील आणि यापैकी बरेच जण पुढे जाऊन पोलीस बनतात सुद्धा.
मात्र काहींना फक्त पोलीस (कॉन्स्टेबल) व्हायचे नसते तर Police Inspector व्हायचे असते आणि म्हणूनच MPSC PSI च्या परीक्षेसाठी जोमाने तयारी सुरु करतात. पण अनेक वेळेस अभ्यासासाठी कोणती पुस्तके वापरावीत याबाबत गोंधळ निर्माण होतो.
हे पण वाचा : MPSC साठी अर्ज कसा करावा ? स्टेप बाय स्टेप गाईड
हे पण वाचा : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांनी ही पुस्तके नक्की वाचावीत?
कारण बाजारात अनेक पुस्तके उपलब्ध आहेत आणि कुणाला विचारले तर वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळी पुस्तके सुचवतील. याच गोंधळाला बाजूला करण्यासाठी या पोस्ट मध्ये काही पुस्तकांची यादी दिलेली आहे.
MPSC मार्फत घेतली जाणारी ही परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येते. पहिली असते पूर्व परीक्षा या परीक्षेमध्ये पात्र झाल्यास आपल्याला मुख्य परीक्षा देता येते आणि हेच लक्षात घेऊन आपण आधी पूर्णपणे पूर्व परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पूर्व परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच मुख्य परीक्षेचा विचार करायला हवा.
आपल्या सोयीनुसार ती पुस्तके एखाद्या दुकानातून खरेदी करा किंवा आपल्या गावात वाचनालय असल्यास तेथे जाऊन वाचून घ्या. यामधील काही पुस्तके ही ऑनलाईन उपलब्ध आहेत. ती या पोस्टाच्या शेवटी दिलेली आहेत आपल्याला हवी असल्यास आपण दिलेल्या लिंक वरून ऑर्डर करू शकता.
नोंद : ही यादी इंटरनेट वर उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या माहितीच्या आधारावर तयार केलेली आहे. यापैकी बरीच पुस्तके मी वर-वर वाचलेली आहेत तर काही पुस्तके वाचलेली नाहीत, त्यामुळे सर्व पुस्तके अभ्यासासाठी चांगली आहेत असं मी नक्कीच म्हणणार नाही, कारण मला सर्व पुस्तकांचा अनुभव नाही.
पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा पुस्तकांची यादी
MPSC पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा
- NCERT बुक्स ११ वी १२ वी (सर्व विषय) विज्ञान साठी ७ वी ते १२ वी
- आधुनिक भारत - बिपीन चंद्र
- समाजसुधारक - के. सागर
- महाराष्ट्राचा भूगोल - ए. बी. सवदी
- पंचायतराज- के सागर
- भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
- भारतीय अर्थव्यवस्था- रत्नाई प्रकाशन
- विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
- सामान्य विज्ञान - चंद्रकांत गोरे
- गणित क्लुप्त्या आणि उत्तरे - पंढरीनाथ राणे
- बुद्धिमत्ता चाचणी - अनिल अंकलगी
- चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य, इंटरनेट
- गाईड- एकनाथ पाटील / के. सागर
MPSC पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा
- MPSC पोलिस उपनिरीक्षक पेपर- 1
- मराठी
- मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
- अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
- य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
- इंग्रजी
- इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
- Wren and Martin English Grammar
- अनिवार्य इंग्रजी - के. सागर प्रकाशन
- MPSC पोलिस उपनिरीक्षक पेपर -2
- आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोवर आणि बेल्हेकर
- आधुनिक भारताचा इतिहास - जयसिंगराव पवार
- मेगा स्टेट महाराष्ट्र - ए. बी. सवदी
- भारताचा भूगोल - विठ्ठल घारापुरे
- भारतीय राज्यपद्धत्ती - वि.मा. बाचल
- महाराष्ट्र शासन आणि राजकारण - बी. बी. पाटील
- पंचायतराज - के सागर
- आपले संविधान - सुभाष कश्यप
- आपली संसद - सुभाष कश्यप
- मावाधिकार - NBT प्रकाश
- मानवाधिकार आणि मनुष्यबळ - रंजन कोळंबे
- अर्थशास्त्र - देसाई भालेराव
- वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक - के सागर
- विज्ञान तंत्रज्ञान - के सागर
- गणित क्लुप्त्या आणि उत्तरे - पंढरीनाथ राणे
- बुद्धिमत्ता चाचणी - अनिल अंकलगी
- माहितीचा अधिकार - यशदा पुस्तिका
- मुंबई पोलिस अधिनियम - प. रा. चांदे
- मुंबई पोलिस - एस. व्ही. कुलकर्णी
- मानवी हक्क व जबाबदाऱ्या - चंद्रकांत मिसळ
हे पण वाचा : MPSC राज्यसेवा पुस्तकांची यादी
3 टिप्पण्या