MPSC परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे आहे! पण MPSC साठी अर्ज कसा करावा ? त्यासाठी आवश्यक पात्रता काय इत्यादी प्रश्न मनात आहेत. तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेले आहेत.
या पोस्ट मध्ये आपण अर्ज कसा करावा तसेच परीक्षेसाठी आवश्यक असणारी पात्रता समजून घेणार आहोत.
आयोगाकडून अर्ज भरण्यासाठी नविन वेबसाईट सुरु केल्यापासून अर्ज करण्याची पध्दत थोडीसी बदलेली आहे. आपल्याला याच नविन वेबसाईटचा वापर फॉर्म भरण्यासाठी करायचा आहे.
https://mpsconline.gov.in ही आयोगाची नविन वेबसाईट आहे, भविष्यात येणारे सर्व MPSC फॉर्म याच वेबसाईट वरून भरले जातील.
MPSC साठी अर्ज कसा करावा ?
चला तर आता समजून घेऊया फॉर्म कसा भरावा ?
स्टेप 1 : Registration
फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी आपल्याला वर दिलेल्या आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन नविन Registration करून घ्यावे लागेल.
Registration करत असताना आपला नेहमी चालू असणारा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका, हे आपल्याला भविष्यात सहज बदलता येणार नाही.
येथे तयार केलेला पासवर्ड व्यवस्थित एखाद्या ठिकाणी लिहून ठेवा, भविष्यात लॉगीन करण्यासाठी याचा वापर करावा लागेल.
स्टेप 2 : Login
Registration झाल्याननंतर आपला मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी व आधी तयार केलेला पासवर्ड टाकून लॉगीन करा.
स्टेप 3 : Profile Creation
आता आपल्याला MPSC च्या वेबसाईट वर आपली प्रोफाईल तयार करायची आहे. प्रोफाईल तयार करण्यासाठी सहा स्टेप देण्यात आलेल्या आहेत. त्या स्टेप मध्ये काय करावे लागेल ते आपण थोडक्यात समजून घेऊया.
Step 1 : Personal Information
पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे. ही माहिती अचूक भरणे आवश्यक आहे, कारण येथे दिलेल्या माहितीमध्ये फारसा बदल करता येत नाही. त्यामुळे आधीपासूनच कागदपत्रे सोबत घेऊन माहिती भरायला बसा.
Aadhar Details : याठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर आणि त्यावरील नाव जसेच्या तसे टाकायचे आहे.
Personal Details : खाली पर्सनल डिटेल्स मध्ये आपल्याला आपले नाव, जन्म तारीख, लिंग, आईचे नाव यासारखी माहिती भरायची आहे. सोबतच आपल्याला मराठी वाचता येते का असा प्रश्न सुध्दा विचारला जातो.
Physical Measurement : येथे आपल्याला आपली उंची किती आहे ते से.मी मध्ये टाकावे लागेल आणि वजन किती आहे तेही भरणे आवश्यक आहे.
याच Tab वर आपल्याला आपल्याकडे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आहे किंवा नाही तसेच आपण आरक्षित प्रवर्गामध्ये मोडत असाल तर जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलेयर इत्यादी माहिती सुध्दा भरावी लागेल.
वरील सर्व माहिती भरल्या नंतर Next बटणवर क्लिक करा.
Step 2 : Address Details
दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला आपला सध्या राहत असलेला पत्ता आणि कायमचा पत्ता कोणता याविषयी माहिती भरायची आहे. भरून झाल्यावर Next बटनवर क्लिक करा.
Step 3 : Other Information
तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला फक्त Yes किंवा No एवढेच करायचे आहे. येथे आपल्यावर एखादी कोर्ट केस चालू आहे का? तसेच आपल्याला कधी Black List केले गेले आहे का ? इत्यादी प्रश्न विचारले जातील ते नीट वाचून yes किंवा No ते निवडा.
Step 4 : Qualification Information
चौथ्या स्टेप मध्ये आपल्याला आपली सर्व शैक्षणिक अर्हतेची माहिती भरायची आहे. सर्वात आधी आपण दहावी ची माहिती भरून पुढे जेवढे पण शिक्षण असेल SSC, HSC, Graduation etc. ते सर्व Add करू सकता.
MS-CIT सारखे सर्टिफिकेट कोर्सेस असतील तेही याठिकाणी Add करता येतील त्यामुळे तेही करून घ्या. सर्व भरून झाल्यावर पुढच्या स्टेप साठी Next वर क्लिक करा.
Step 5 : Experience Information
येथे आपल्याला एखाद्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव असेल तर तो भरता येईल. जर आपल्याकडे कुठलाही अनुभव नसेल तर No वर क्लिक करून पुढे जा.
Step 6 : Photo and Sign Upload
येथे आपल्याला आपल्या प्रोफाईल साठी फोटो आणि सही अपलोड करायची आहे. फोटो आणि सही अपलोड करण्याअगोदर त्यांची साईझ 50kb पेक्षा जास्त नाही आहे याची खात्री करून घ्या.
फोटोची लांबी ही 125 ते 130 Pixels तर उंची 150 ते 170 Pixels इतकी असावी तसेच सहीची लांबी 125 ते 130 Pixels आणि उंची 50 ते 60 Pixels इतकी असावी.
वरील सर्व स्टेप पूर्ण केल्यावर आता आपली प्रोफाईल पूर्ण तयार होईल ती सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आता आपल्याला कोणत्याही पात्र MPSC परीक्षेसाठी फॉर्म भरता येणार आहे.
स्टेप 4 : Online Application
आपली प्रोफाईल पूर्ण झाल्यावर Online Application नावाच्या tab वर क्लिक करा, येथे सध्या सुरु असलेल्या सर्व जाहिराती दाखविण्यात येतील.
यापैकी आपण कोणत्या जाहिरातीसाठी पात्र आहोत ते बघा आणि त्या जाहिरातीवर क्लिक करून Apply बटणवर क्लिक करा.
यानंतर आपल्याला आपली फी भरावी लागेल ती आपण Debit Card, इंटरनेट बँकिंग, UPI इत्यादी कोणत्याही ऑनलाईन पध्दतीचा वापर करून भरू सकता.
फी भरल्यानंतर आपल्याला फॉर्म आणि फी भरल्याची प्रिंट काढून घेता येईल. तर असा पद्धतीने आपण MPSC साठी अर्ज करू शकणार आहेत.
MPSC साठी शैक्षणिक पात्रता
MPSC परीक्षा देण्यासाठी आपल्याकडे किती शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे? या प्रश्नाचं उत्तर हे आयोगाकडून येणाऱ्या विविध जाहिरातवर अवलंबून असते.
कारण कृषी साठी वेगळी आणि अभियंता साठी वेगळी पात्रतेची आवश्यकता असते. या ठिकाणी आपण सर्व साधारण पात्रता काय असायला पाहिजे ते बघूया.
सर्वसाधारणपणे MPSC परिक्षा देण्यासाठी आपल्याकडे किमान पदवी पर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक जाहिरातीनुसार पात्रता वेगळी असू शकते.
MPSC साठी वयोमर्यादा
परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे कमीत कमी वय हे 19 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जास्तीत जास्त वय 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
वयोमर्यादेमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 3 आणि 5 वर्षे सूट देण्यात येत असते.
MPSC साठी उपयुक्त पुस्तके
MPSC परीक्षेच्या तयारीमध्ये पुस्तकांचे खूप मोठे योगदान असते, म्हणूनच आपल्याला परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या ब्लॉग वरील खालील पोस्ट नक्की बघा.
हे पण वाचा : MPSC Book List in Marathi
हे पण वाचा : MPSC PSI Book List
हे पण वाचा : MPSC Syllabus in Marathi (सुधारित)
0 टिप्पण्या