खाली देण्यात आलेल्या Converter चा वापर करून आपण अगदी सहजपणे टक्केवारी मिळवू शकता. हा app YCMOU कडून देण्यात आलेल्या formula नुसार तयार करण्यात आलेला आहे.
YCMOU CGPA to Percentage Converter
Percentage:
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ म्हणजेच YCMOU मधील काही अभ्यासक्रमांचे निकाल देताना CGPA नुसार दिले जातात मात्र काही इतर विद्यापीठ टक्केवारी (Percentage) नुसार निकाल देत असतात सोबतच काही शासकीय कार्यालयांमध्येही CGPA चे टक्केवारी मध्ये रुपांतर करून मागितले जाते.
त्यासाठीच विद्यापीठाकडून अधिसूचना काढून CGPA ला Percentage मध्ये रुपांतरीत करण्यासाठी Formula देण्यात आलेला आहे. हा formula खालीलप्रमाणे आहे.
Percentage = 10 X CGPA - 7.5
याचा वापर कसा करायचा ते एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा आपला CGPA हा 5 आहे, तर आपण या formula चा वापर करून Percentage कसे काढाल.
तर सर्वात आधी 10 घेऊन त्याला आपल्या CGPA ने गुणायचे आहे नंतर त्यामधून 7.5 वजा केल्यास आपल्याला आपली टक्केवारी मिळणार आहे.
ही टक्केवारी आपल्याला आपल्या अभ्यासकेंद्राकडून प्रमाणित करून घ्यावी लागेल.
YCMOU CGPA to Percentage करण्याचा हा Formula आणि App आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करेल अशी अपेक्षा आहे.
उपयुक्त वाटल्यास इतरांसोबत शेयर करा.
0 टिप्पण्या