Migration Certificate म्हणजे काय? मायग्रेशन सर्टिफिकेटची भासते आणि मायग्रेशन सर्टिफिकेट कुठून घ्यावे लागते किंवा कुठे मिळते? यासारखे प्रश्न आपण एखाद्या ठिकाणी एडमिशन घेतल्यानंतर पडले असतील.
कारण अनेक ठिकाणी कॉलेज मध्ये एडमिशन घेत असताना मायग्रेशन सर्टिफिकेटची मागणी करण्यात येते. एडमिशन घेण्यासाठी कागदपत्रे जमा करत असताना इतर कागदपत्रांसोबत मायग्रेशन सर्टिफिकेट सुद्धा महत्वाचे समजले जाते.
या पोस्ट मध्ये आपण "Migration certificate information in Marathi आणि कुठे मिळेल, आवश्यकता काय?" या टॉपिक वर आधारित सर्व माहिती समजून घेणार आहोत.
हे पण वाचा : अधिवास प्रमाणपत्र म्हणजे आणि ते कसे मिळवायचे ?
What is Migration Certificate? (मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजे काय?)
सरळ सोप्या मराठी भाषेत आपण मायग्रेशन सर्टिफिकेटला स्थलांतर प्रमाणपत्र सांगत असतो. स्थलांतर या शब्दावरून आपल्याला वर-वर कल्पना मिळाली असेल की हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र आहे.
आता हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ, आपण आपले B.A एका विद्यापीठातून (समजा मुंबई विद्यापीठ) पूर्ण केले आणि आता आपल्याला दुसऱ्या विद्यापीठामध्ये (समजा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) M.A साठी एडमिशन घ्यायचे आहे.
तर याठिकाणी आपण एक विद्यापीठ (मुंबई विद्यापीठ) सोडून दुसऱ्या विद्यापीठामध्ये (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) जात असल्याने विद्यापीठ बदलत आहे.
म्हणून पहिल्या विद्यापीठाचे (मुंबई विद्यापीठ) मायग्रेशन सर्टिफिकेट दुसऱ्या विद्यापीठामध्ये (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) जमा करणे आवश्यक असते.
सरळ शब्दात सांगितले तर आपण आपले विद्यापीठ सोडून दुसऱ्या विद्यापीठामध्ये एडमिशन घेत असल्याची विद्यापीठाला कुठलीही हरकत नाही हे सांगणारे सर्टिफिकेट म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट असते.
Migration Certificate तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो?
प्रत्येक विद्यापीठाची (University) कार्य करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळे मायग्रेशन सर्टिफिकेट साठी लागणारा वेळ प्रत्येक विद्यापीठामध्ये वेगळा असू शकतो, परंतु बऱ्याचशा विद्यापीठामध्ये मायग्रेशन सर्टिफिकेट दहा ते पंधरा दिवसात तयार होत असतो.
कधी - कधी हा कालावधी एक महिन्यापर्यंत जाऊ शकतो. जर आपल्याला लवकर पाहिजे असेल तर आपण थेट विद्यापीठात जाऊन सुद्धा मायग्रेशन सर्टिफिकेट मिळवू शकता. काही विद्यापीठात एका दिवसातही मायग्रेशन सर्टिफिकेट देण्यात येते.
Migration Certificate कसे तयार होते?
मायग्रेशन सर्टिफिकेट बनवून घेण्यासाठी / काढण्यासाठी सोपी प्रक्रिया असते खाली काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यांचा वापर करून आपणही मायग्रेशन सर्टिफिकेट मिळवू शकता.
सर्वात आधी आपल्याला त्या विद्यापीठामधून मायग्रेशन सर्टिफिकेट मिळविण्यासाठीचा फॉर्म घ्यावा लागेल जिथून आपण शिक्षण घेतले (पूर्ण केले) आहे.
आता या फॉर्म मध्ये आपण कोणते शिक्षण पूर्ण केले आणि पुढे कोणत्या विद्यापीठामध्ये कुठल्या शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेणार आहेत याचा उल्लेख करावा लागेल.
फॉर्म भरल्यानंतर हा फॉर्म विद्यापीठामध्ये जमा करावा लागेल. या फॉर्म सोबत आपल्याला काही शुल्क (Fee) सुद्धा भरावी लागेल.
फॉर्म जमा केल्यानंतर आपले मायग्रेशन सर्टिफिकेट तयार करण्यात येईल, काही विद्यापीठामध्ये फॉर्म भरण्याची / जमा करण्याची प्रक्रिया ऑनलाईन तर काही ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जाऊन सुद्धा करता येते.
Migration Certificate ची आवश्यकता का असते?
- जर आपण आपले बोर्ड किंवा विद्यापीठ बदलत असाल तर याची आवश्यकता असते, म्हणून हे महत्वाचे आहे.
- या सर्टिफिकेटचा अर्थ असा कि आपण आधीच्या विद्यापीठामध्ये खरोखर शिक्षण घेतले आहे. आणि आता दुसऱ्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणार आहेत.
- मायग्रेशन सर्टिफिकेट शिवाय कोणत्याही विद्यापीठामध्ये / कॉलेजमध्ये एडमिशन मिळत नाही, म्हणून हे सर्टिफिकेट खूप महत्वाचे समजले जाते.
Migration Certificate साठी आवश्यक कागदपत्र (Documents) कोणते?
मायग्रेशन फॉर्म सोबत आपल्याला काही कागदपत्र (झेरॉक्स) जोडावे लागतात. ते खालीलप्रमाणे आहेत.
- शेवटची मार्कशीट
- पासिंग सर्टिफिकेट
- शुल्क (Fee) जमा केल्याची पावती (Receipt)
- आधार कार्ड (किंवा कोणताही ओळखपत्र)
वरील सर्व कागदपत्र झेरॉक्सच्या रूपात आपल्याला जमा करावे लागतात, आपले मूळ (Origional) कागदपत्र जमा करू नका :)
या पोस्टमध्ये आपण "Migration Certificate Meaning in Marathi आणि कुठे मिळेल, आवश्यकता काय?" या विषयावर माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आशा आहे हि माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरली असेल, अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा, धन्यवाद !
1 टिप्पण्या
धन्यवाद.