आधार कार्ड, वोटर आयडी, लिव्हिंग सर्टिफिकेट, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांप्रमाणेच अधिवास प्रमाणपत्र हे सुद्धा एक महत्वाचे प्रमाणपत्र आहे . शैक्षणिक प्रवेश , नोकरी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता भासत असते. म्हणूनच या पोस्ट मध्ये अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय आणि ते कसे मिळवायचे? या विषयी माहिती बघणार आहोत .
अधिवास प्रमाणपत्रालाच इंग्रजीमध्ये Domicile Certificate असे सांगितले जाते, त्यामुळे हे दोन वेगवेगळे प्रमाणपत्र नसून एकच प्रमाणपत्र आहे . हे समजून घेणे आवश्यक आहे.
अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय ?
एखादी व्यक्ती संबंधित राज्याची कायमची रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून देण्यात येणाऱ्या दाखल्याला अधिवास प्रमाणपत्र किंवा वय, राष्ट्रीयत्व आणि रहिवासी प्रमाणपत्र असे म्हणतात. हे प्रमाणपत्र राज्य सरकार कडून देण्यात येते. विशेषतः हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी तसेच प्रवेशासाठी उपयोगी पडते . तसेच इतर व्यक्त्तींना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.
संपूर्ण देशामध्ये फक्त एका राज्याचे अधिवास प्रमाणपत्र काढता येते तसेच एकापेक्षा जास्त राज्यामध्ये अधिवास प्रमाणपत्र काढणे कायदेशीर गुन्हा आहे.
अधिवास प्रमाणपत्र कसे मिळवायचे?
अधिवास प्रमाणपत्र देण्याचे अधिकार महसूल विभागाचे अधिकारी (RDOs), मंडळ अधिकारी (COs), उपविभागीय अधिकारी (SDOs)/जिल्हा दंडाधिकारी (DMs), तहसीलदार अधिकारी/उपविभागीय अधिकारी (DMs) यांना असतात .
अधिवास प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपण संबंधित कार्यालयात किंवा सेतू , महा ई-सेवा केंद्राला भेट देऊ शकता.
तसेच कोणतेही प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासनाकडून https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हे पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून सुद्धा आपण अधिवास प्रमाणपत्र मिळवू शकता.
अर्ज केल्यानंतर १ ५ दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला संबंधित अधिकाऱ्यामार्फत अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाते .
अधिवास प्रमाणपत्र साठी लागणारी कागदपत्रे कोणती ?
अधिवास प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ओळख , पत्ता आणि वयाच्या पुराव्याची आवश्यकता असते. या पुराव्यांची पूर्तता करण्यासाठी ओळख , पत्ता आणि वयाचे किमान एक - एक तरी कागदपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे .
ओळखीचा पुरावा : पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, वाहनचालक परवाना
पत्त्याचा पुरावा : पासपोर्ट, लाईट बिल, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, वाहनचालक परवाना, मालमत्ता नोंदणी उतारा, ७/१२ आणि ८ अ चा उतारा
वयाचा पुरावा : जन्माचा दाखला, बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी)
वरील कागदपत्रांव्यतिरिक्त इतरही काही कागदपत्रांची आवश्यकता अर्ज करण्यासाठी असते ते खालीलप्रमाणे
इतर आवश्यक कागदपत्रे : लाईट बिल, भाडेपावती, रेशनकार्ड, दूरध्वनी बिल, विवाहाचा दाखला, पाणीपट्टी पावती, मालमत्ता करपावती, मतदार यादीचा उतारा, मालमत्ता नोंदणी उतारा, पतीच्या रहिवासाचा दाखला
शिष्यवृत्तीसाठी (Scholarship ) अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे का ?
हो! प्रत्येक विद्यार्थ्याला त्या - त्या राज्यामध्ये दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता असते. शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सदरील विद्यार्थी हा संबंधित राज्याचा कायमचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून अधिवास प्रमाणपत्र सादर केले जाते .
(अधिवास प्रमाणपत्र) डोमासाईल किती दिवस चालते?
डोमासाईल किती दिवस चालते किंवा किती कालावधीसाठी असेल यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. अधिवास प्रमाणपत्र हे संबंधित व्यक्ती ते राज्य कायमचे सोडून जात नाही किंवा ती व्यक्ती मरण पावत नाही तोपर्यंत ग्राह्य समजले जाते.
0 टिप्पण्या