बारावी नंतर सरकारी नोकरीच्या बऱ्याच पर्यायांपैकी एक पोलीस भरती सुद्धा आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या मित्र - मैत्रिणींसाठी पोलीस भरती हा सर्वपरिचित आणि चांगला पर्याय असल्याने सरकारी नोकरीच्या शोधात असणारे बरेच मित्र - मैत्रिणी पोलीस भरतीकडे वळताना बघायला मिळतात. परंतु नव्याने तयारी करणाऱ्या मित्र - मैत्रिणींना बारावी नंतर पोलीस भरती कशी करावी ? हा प्रश्न पडत असतो म्हणूनच या पोस्टमध्ये आपण बारावी नंतर पोलीस भरतीची तयारी कशी करता येईल हे समजून घेणार आहोत.
पोलीस भरतीमध्ये आपल्याला आधी शारीरिक चाचणी नंतर लेखी परीक्षा आणि शेवटी वैद्यकीय तपासणी मधून जावे लागते. या सर्व पायऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आपल्याला पोलीस म्हणून नियुक्ती दिली जाते. आता पोलीस भरतीमध्ये शारीरिक चाचणी कशी असेल याची माहिती घेऊया.
पोलीस भरतीसाठी शारीरिक (मैदानी) चाचणी कशी असेल ?
शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदींनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची शारीरिक चाचणी ही 50 गुणांची असेल.
पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
पोलीस भरतीसाठी उंची किती लागते ?
महिला (Female) : महिला उमेदवारांची कमीत कमी उंची ही 155 CM इतकी असावी
पुरुष (Male) : पुरुष उमेदवारांची कमीत कमी उंची ही 165 CM इतकी असावी.
पोलीस भरतीसाठी छाती किती लागते ?
पुरुष : पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला : महिलांसाठी लागू नाही.
पोलीस भरती शारीरिक चाचणी : पुरुष
- 1600 मीटर धावणे : 20 गुण
- 100 मीटर धावणे : 15 गुण
- गोळा फेक : 15 गुण
- एकूण : 50 गुण
पोलीस भरती शारीरिक चाचणी : महिला
- 800 मीटर धावणे : 20 गुण
- 100 मीटर धावणे : 15 गुण
- गोळा फेक : 15 गुण
- एकूण : 50 गुण
हे पण वाचा : महिला पोलीस भरती विषयी माहिती समजून घ्या (Maharashtra Police Constable)
मैदानी चाचणीची तयारी कशी करावी ?
पोलीस भरतीची तयारी आपण स्वतःच (घरीच) करणार असल्याने वर दिलेले इव्हेंट्स नजरेसमोर ठेवून धावणे, गोळाफेक इत्यादी व्यायाम (सराव) नियमित चालू ठेवणे आवश्यक आहे. एक चांगला ताळमेळ जुळणारा वेळापत्रक बनवून आपण आपली तयारी अजून चांगल्या प्रकारे करू शकता.
वरील दिलेल्या माहितीनुसार आपली शारीरिक चाचणी घेतली जाते आणि यामध्ये किमान 50 टक्के गुण मिळालेल्या उमेदवारांनाच लेखी परीक्षा देता येते. त्यामुळे आता लेखी परीक्षा कशी होईल याची माहिती घेऊया.
महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा कशी होईल ?
शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये किमान 50 टक्के गुण मिळालेल्या उमेदवारांनाच लेखी परीक्षा देता येणार आहे , परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. ही परीक्षा मराठी मधून घेण्यात येत असते. लेखी परीक्षा ही शंभर गुणांची असून त्यासाठी उमेदवारांना 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो.
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेमध्ये यापेक्षा कमी गुण मिळवलेले उमेदवार भरतीसाठी अपात्र समजले जातील.
पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम आणि त्यासाठी गुणांची विभागणी खालीप्रमाणे असते.
- अंकगणित : 25 गुण
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी : 25 गुण
- बुद्धिमत्ता चाचणी : 25 गुण
- मराठी व्याकरण : 25 गुण
- एकूण : 100 गुण
हे पण वाचा : पोलीस भरती साठी कोणती पुस्तके वाचावी ?
लेखी परीक्षेची तयारी कशी करावी ?
लेखी परीक्षा कशी होईल हे आपण वर बघितले आहे. तर आता आपल्याला परीक्षेमध्ये येणाऱ्या विषयांचा नियमित अभ्यास चालू करावा लागेल. मैदानी चाचणीसाठी तयार केलेल्या वेळापत्रकामध्ये लेखी परीक्षेच्या अभ्यासासाठी सुद्धा नियोजन करा.
एका दिवशी एका विषयाचा अभ्यास करा जेणेकरून आपल्याला तो विषय समजून घ्यायला जास्त मदत होईल. एकाच दिवशी सर्व विषय घेऊन गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या.
आपल्याला लेखी परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करता यावी म्हणून आम्ही पोलीस भरतीसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी तयार केली आहे. ही यादी आपल्याला वरील दिलेल्या लिंकवरून बघता येईल.
जर आपण नुकतेच बारावी उत्तीर्ण झाले असतील तर आपली वय ही पोलीस भरतीसाठी अगदी योग्य आहे, पण तरीही पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे याची माहिती आपण समजून घेऊया.
महाराष्ट्र पोलीस भरती वयोमर्यादा
कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 28 वर्षे वय असणारे उमेदवार पोलीस भरतीसाठी पात्र असतील; परंतु काही घटकांना वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे असेल.
- खुला प्रवर्ग : 18 ते 28 वर्षे
- मागास प्रवर्ग : 18 ते 33 वर्षे
- प्रकल्पग्रस्त उमेदवार : 18 ते 45 वर्षे
- माजी सैनिक : सेवेतील कालावधी अधिक तिन वर्षे इतकी सूट
- अनाथ उमेदवार : 18 ते 33 वर्षे
- भूकंपग्रस्त उमेदवार : 18 ते 45 वर्षे
- खेळाडू : 18 ते 33 वर्षे
- पोलीस पाल्य : 18 ते 33 वर्षे
- गृहरक्षक (Home Guard) : 18 ते 33 वर्षे
- महिला उमेदवार : 18 ते 33 वर्षे
सर्व माहिती व्यवस्थितपणे समजून घेतल्यानंतर आता पोलीस भरतीसाठी आपल्याकडे कोणती कागदपत्रे असायला हवीत याची माहिती घेऊया.
पोलीस भरती कागदपत्रे
- तुमचा फोटो आणि स्वाक्षरी (ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करण्यासाठी)
- SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जन्म दाखला
- रहिवाशी प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर)
- MS CIT प्रमाणपत्र
- लेखी परीक्षेला जाताना एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. (पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक, आधारकार्ड यापैकी कोणतेही चालेल)
- डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
- जात वैधता प्रमाणपत्र (जात पडताळणी)
- सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
- खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर)
- भुकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र (आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर)
- पोलीस पाल्य प्रमाणपत्र (आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर)
- अनाथाबाबतचे प्रमाणपत्र (आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर)
- अंशकालीन प्रमाणपत्र (आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर)
वरील सर्व कागदपत्रे पोलीस भरतीसाठी आवश्यक असली तरी सुद्धा सर्व कागदपत्रे सर्वांसाठी गरजेची नाही जसे की SC/ST प्रवर्गाला नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्रची आवश्यकता भासत नाही. हे समजून घेणे गरजेचं आहे.
वरील सर्व माहितीमधून आपल्याला बारावी नंतर पोलीस भरती कशी करावी या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळाले असेल. ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटल्यास बारावी नंतर पोलीस होण्याची इच्छा असणाऱ्या आपल्या मित्र - मैत्रिणींना शेयर करा .
0 टिप्पण्या