YCMOU Migration Certificate Application Process | 2019 च्या आधी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निर्णयानुसार आता विद्यार्थ्यांना मायग्रेशनसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
फी भरण्यासाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे आता DD काढावा लागणार नाही, तसेच प्रमाणपत्र घेण्यासाठी विद्यापीठात जाण्याचीही आवश्यकता नसणार आहे.
मायग्रेशनचा अर्ज करण्यासाठी दोन पद्धती देण्यात आलेल्या आहेत. पहिली पद्धत 2019 च्या नंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असेल तसेच दुसरी पद्धत ही 2019 च्या आधी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.
येथे माहिती दिलेली असली तरीसुद्धा आपण पुढील लिंकवरून विद्यापीठाचे अधिकृत सूचनापत्र नक्की वाचावे.
हे पण वाचा : Migration Certificate म्हणजे काय ?
या ठिकाणी आपण दोन्ही पद्धती नीट समजून घेऊ. पण आधी दुसरी पद्धत बघूया.
2019 च्या आधी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मायग्रेशनची प्रोसेस
जे विद्यार्थी 2019 च्या आधी उत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना मायग्रेशन फॉर्म प्रिंट करून स्व:हस्ताक्षरात भरावा लागणार आहे.
खालील लिंक वरून फॉर्म डाऊनलोड करता येईल.
YCMOU Migration Certificate Form PDF Download
वरील लिंकवरून फॉर्म डाऊनलोड करून घ्या आणि त्यांनतर खाली दिलेल्या माहितीचा वापर करून रु. 400/- फी NEFT/RTGS च्या माध्यमाने भरून त्याची Receipt (पावती) घ्या.
फी भरण्यासाठी माहिती :
खात्याचे नाव : वित्त अधिकारी, यचममुवि, नाशिक
खाते क्रमांक : 1323004456
IFSC Code : CBIN0284246
वरील लिंकवरून डाऊनलोड केलेला फॉर्म आणि भरलेल्या फी ची पावती सोबत आपल्या शेवटच्या वर्षाचे मार्कशिट जोडून विद्यापीठाच्या खालील पत्त्यावर पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक - 422 222
ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाकडून 10 ते 15 दिवसात मायग्रेशन स्पीड पोस्टाने आपण फॉर्म मध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.
2019 च्या नंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मायग्रेशनची प्रोसेस
खालील Video मध्ये मायग्रेशनची पूर्ण प्रोसेस दिलेली आहे.