महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC कडून 2023 मध्ये राज्यसेवा साठी नविन अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. MPSC कडून आपल्या अधिकृत वेबसाईटवर नविन अभ्यासक्रमाची PDF अपलोड करण्यात आली आहे.
राज्यसेवा परीक्षा प्रिलिम्स आणि मेन्स या दोन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना सर्वात आधी अभ्यासक्रमाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
या पोस्ट मध्ये आपण MPSC राज्यसेवा प्रिलिम्स आणि मेन्सच्या अभ्यासक्रमाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 Pattern
आयोगाच्या नविन परीक्षा पद्धतीनुसार पूर्व परीक्षेसाठी दोन पेपर होणार आहेत आणि त्यासाठी एकूण 400 गुण असणार आहेत. यामधील पहिल्या पेपरच्या गुणांचा विचार मेन्स परीक्षेसाठी केला जाणार आहे.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी दोन पेपर घेण्यात येतात त्याची माहिती खाली दिलेली आहे.
पेपर 1 : सामान्य अध्ययन
गुण : 200
पेपरचा दर्जा : पदवी
प्रश्न : 100
वेळ : 2 तास
पेपर 2 : नागरी सेवा अभियोग्यता चाचणी (CSAT)
गुण : 200
पेपरचा दर्जा : Topic No. (1) to (5) Degree Level, Topic No. (6) class X level, Topic No. (7) X/XII level
प्रश्न : 80
वेळ : 2 तास
पहिल्या पेपरसाठी अभ्यासक्रम आणि त्यामधील घटक कोणते आहेत याबद्दल माहिती खाली दिलेली आहे.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 अभ्यासक्रम - घटक (2023 Pattern)
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असणाऱ्या सद्य घटना.
- भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास.
- भारतीय आणि जागतिक भूगोल- भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल
- भारतीय राज्य व शासन- राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, अधिकार मुद्दे इ.
- आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, गरीबी, समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इ.
- पर्यावरणीय विज्ञान, जैव-विविधता आणि हवामान बदलावरील सर्वसामान्य समस्या
- सामान्य विज्ञान
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 2 (CSAT) अभ्यासक्रम - घटक (2023 Pattern)
राज्यसेवा पेपर 2 च्या अभ्यासक्रमात मुलभूत समस्या सोडवण्याचे कौशल्य, मुलभूत इंग्रजी आणि मराठी तसेच डेटा इंटरप्रीटेशन यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
खाली राज्यसेवा पेपर 2 च्या अभ्यासक्रमाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
- आकलन
- संवाद कौशल्यासह आंतरव्यक्ती कौशल्ये
- तार्किक क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमता
- निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे
- सामान्य मानसिक क्षमता
- मूलभूत संख्या क्षमता (संख्या आणि त्यांचे संबंध, विशालतेचा क्रम इ.) (इयत्ता दहावीची पातळी), डेटा अन्वयार्थ (चार्ट, आलेख, सारख्या डेटा पूरकता इ. दहावीची पातळी)
- इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (दहावी पातळी).
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम : 2023 Pattern
MPSC मेन्स परीक्षेसाठी एकूण 9 पेपर असतात, त्यांचा अभ्यासक्रम खाली दिलेला आहे.
पेपर क्रमांक | विषय | गुण | दर्जा | माध्यम | वेळ | पात्रता/अनिवार्य | प्रश्नपत्रिकेचे स्वरूप |
---|---|---|---|---|---|---|---|
पेपर I(कोड- 1001) | मराठी | 300 | मॅट्रिक | मराठी | 3 तास | (25% गुणांसह पात्रता) | पारंपारिक/वर्णनात्मक |
पेपर 2 (कोड-1002) | इंग्रजी | 300 | मॅट्रिक | इंग्रजी | 3 तास | - | |
गुणवत्तेसाठी मोजण्यात येणारे पेपर | |||||||
पेपर 3 (कोड-1003) | निबंध | 250 | पदवी | मराठी/इंग्रजी | 3 तास | अनिवार्य | पारंपारिक/वर्णनात्मक |
पेपर 4 (कोड-1004) | सामान्य अध्ययन | 250 | पदवी | मराठी/इंग्रजी | 3 तास | ||
पेपर 5 (कोड-1005) | सामान्य अध्ययन | 250 | पदवी | मराठी/इंग्रजी | 3 तास | ||
पेपर 6 (कोड-1006) | सामान्य अध्ययन | 250 | पदवी | मराठी/इंग्रजी | 3 तास | ||
पेपर 7 (कोड-1007) | सामान्य अध्ययन | 250 | पदवी | मराठी/इंग्रजी | 3 तास | ||
पेपर 8 (कोड-1008) | ऐच्छिक विषय पेपर- I | 250 | पदवी | मराठी/इंग्रजी | 3 तास | ||
पेपर 9 (कोड-1009) | ऐच्छिक विषय पेपर- II | 250 | पदवी | मराठी/इंग्रजी | 3 तास |
MPSC Syllabus in Marathi बद्दलची ही पोस्ट आपल्याला तयारी करण्यास उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.
0 टिप्पण्या