MPSC PSI Book List | Police Inspector होण्यासाठी ही पुस्तके एकदा तरी वाचायला हवीत

MPSC PSI Books List

MPSC PSI Books in Marathi

लहानपणी जेव्हा शाळेत विचारण्यात येते की, तू मोठा होऊन काय होणार आहेस? असा वेळी अनेक उत्तरे येतात जसे शिक्षक, डॉक्टर, वकील तर कुणी म्हणेल मी सचिन तेंडूलकर होणार म्हणून. पण सर्वात जास्त पसंती मिळते पोलिस होणार असल्याला.

ग्रामिण भागात तर पोलिस होण्याची इच्छा असणारे अनेक मुलं / मुली मिळतील आणि यापैकी बरेच जण पुढे जाऊन पोलीस बनतात सुद्धा.

मात्र काहींना फक्त पोलीस (कॉन्स्टेबल) व्हायचे नसते तर Police Inspector व्हायचे असते आणि म्हणूनच  MPSC PSI च्या परीक्षेसाठी जोमाने तयारी सुरु करतात. पण अनेक वेळेस अभ्यासासाठी कोणती पुस्तके वापरावीत याबाबत गोंधळ निर्माण होतो.

हे पण वाचा : MPSC साठी अर्ज कसा करावा ? स्टेप बाय स्टेप गाईड

हे पण वाचा : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांनी ही पुस्तके नक्की वाचावीत?

कारण बाजारात अनेक पुस्तके उपलब्ध आहेत आणि कुणाला विचारले तर वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळी पुस्तके सुचवतील. याच गोंधळाला बाजूला करण्यासाठी या पोस्ट मध्ये काही पुस्तकांची यादी दिलेली आहे.

MPSC मार्फत घेतली जाणारी ही परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येते. पहिली असते पूर्व परीक्षा या परीक्षेमध्ये पात्र झाल्यास आपल्याला मुख्य परीक्षा देता येते आणि हेच लक्षात घेऊन आपण आधी पूर्णपणे पूर्व परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पूर्व परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच मुख्य परीक्षेचा विचार करायला हवा.

आपल्या सोयीनुसार ती पुस्तके एखाद्या दुकानातून खरेदी करा किंवा आपल्या गावात वाचनालय असल्यास तेथे जाऊन वाचून घ्या. यामधील काही पुस्तके ही ऑनलाईन उपलब्ध आहेत. ती या पोस्टाच्या शेवटी दिलेली आहेत आपल्याला हवी असल्यास आपण दिलेल्या लिंक वरून ऑर्डर करू शकता.

नोंद : ही यादी इंटरनेट वर उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या माहितीच्या आधारावर तयार केलेली आहे. यापैकी बरीच पुस्तके मी वर-वर वाचलेली आहेत तर काही पुस्तके वाचलेली नाहीत, त्यामुळे सर्व पुस्तके अभ्यासासाठी चांगली आहेत असं मी नक्कीच म्हणणार नाही, कारण मला सर्व पुस्तकांचा अनुभव नाही.

पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा पुस्तकांची यादी

MPSC पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा

MPSC पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा

  • MPSC पोलिस उपनिरीक्षक पेपर- 1
  • MPSC पोलिस उपनिरीक्षक पेपर -2
    • आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोवर आणि बेल्हेकर
    • आधुनिक भारताचा इतिहास - जयसिंगराव पवार
    • मेगा स्टेट महाराष्ट्र - ए. बी. सवदी
    • भारताचा भूगोल - विठ्ठल घारापुरे
    • भारतीय राज्यपद्धत्ती - वि.मा. बाचल
    • महाराष्ट्र शासन आणि राजकारण - बी. बी. पाटील
    • पंचायतराज - के सागर
    • आपले संविधान - सुभाष कश्यप
    • आपली संसद - सुभाष कश्यप
    • मावाधिकार - NBT प्रकाश
    • मानवाधिकार आणि मनुष्यबळ - रंजन कोळंबे
    • अर्थशास्त्र - देसाई भालेराव
    • वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक - के सागर
    • विज्ञान तंत्रज्ञान - के सागर
    • गणित क्लुप्त्या आणि उत्तरे - पंढरीनाथ राणे
    • बुद्धिमत्ता चाचणी - अनिल अंकलगी
    • माहितीचा अधिकार - यशदा पुस्तिका
    • मुंबई पोलिस अधिनियम - प. रा. चांदे
    • मुंबई पोलिस - एस. व्ही. कुलकर्णी
    • मानवी हक्क व जबाबदाऱ्या - चंद्रकांत मिसळ
यापैकी बरीच पुस्तके मी वाचलेली असल्यामुळे ती खरोखर चांगली आहेत असं सांगू सकतो, इतर पुस्तकं सुध्दा चांगली आहेत पण अजूनही ती वाचण्याचा योग आलेला नाही, पण आपण नक्की वाचणार आहात त्यामुळे कमेंट करून नक्की कळवा ही सर्व पुस्तके कशी आहेत.

हे पण वाचा : MPSC राज्यसेवा पुस्तकांची यादी

आशा करतो की ही पोस्ट आपल्याला उपयोगी पडेल आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचाल, पुढील वाटचालीसाठी आतापासूनच शुभेच्छा !

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
अगदी सुलभ सोप्या भाषेत परीक्षेबद्दल वरील माहिती दिलेली लक्षणीय आहे... त्याच बरोबर महत्वपूर्ण पुस्तकांची यादी उत्तम आहे...
Unknown म्हणाले…
सर...अजुन विविध परिक्षांबद्दल आपण सविस्तर सुलभ भाषेत माहिती देऊन ग्रामीण भागातील अभ्यासकांना चांगली त्यांच्यात ओढ निर्माण कराल अशी अपेक्षा ...