पोलीस होण्यासाठी काय करावे लागते ? कुणाला होता येईल पोलीस

पोलीस होण्यासाठी काय करावे लागते

सरकारी नोकरी मधील पोलीस भरती ही एक असी भरती आहे, ज्याची अनेक जन वाट बघत असतात आणि त्यासाठी तयारी करत असतात. अनेकांना पोलीस व्हायचे असते परंतु पोलीस होण्यासाठी काय करावे कागते याची पुरेसी माहिती नसल्याने ते तयारीच करत नाही.

म्हणूनच या पोस्ट मध्ये आपण पोलीस होण्यासाठी काय करावे लागेल याबद्दलची माहिती समजून घेणार आहोत.

पोलीस होण्यासाठी आपल्याला कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे, बारावी पास उमेदवार पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करू सकतो.

फक्त बारावी पास असणे आवश्यक नसून आपल्याला इतर काही शारिरीक पात्रता सुद्धा पूर्ण करणे आवश्यक आहे. जसे पुरुष उमेदवारांची उंची 168 CM पेक्षा कमी नसावी.

पोलीस भरतीसाठीची शारीरिक तसेच इतर पात्रतेविषयी आधीच्या पोस्ट मध्ये माहिती दिलेली आहे. त्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे.

हे पण बघा : महिला पोलीस भरती विषयी माहिती

आपण सर्व पात्रता पूर्ण करत असाल तर आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यावी लागते, ज्यामध्ये मैदानी तसेच लेखी परीक्षेचा समावेश असतो.

हे पण बघा : पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तके वाचावीत ?

परीक्षा झाल्यानंतर आपल्याला मिळालेल्या गुणांच्या आधारावर मेरीट तयार करण्यात येते आणि आपण व्यवस्थित तयारी करून परीक्षा दिली असेल तर मेरीट मध्ये येऊन आपली पोलीस शिपाई पदासाठी निवड होऊ सकते.

हे तर पोलीस शिपाई पदासाठी झाले महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये अनेक पदे आहेत जी Ranks नुसार विभागली गेलेली आहेत, पोलीस विभागात नोकरी मिळविण्यासाठी आपल्याला ranks नुसार वेगवेगळ्या पात्रतेची आवश्यकता असणार आहे.

हे पण बघा : महाराष्ट्र पोलीस Ranks विषयी माहिती

पोलीस शिपाई व्यतिरिक्त आपण MPSC च्या मार्फत PSI  किंवा पोलीस विभागातील इतर पदासाठी सुध्दा अर्ज करू शकता. त्यासाठी आपले पदवी (Graduation) पर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.

हे पण बघा : पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या