पोलीस भरती कागदपत्रे भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

पोलीस भरतीसाठी अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे आपणही तयारी करत असाल, पण शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेच्या तयारीसोबतच आपल्याला पोलीस भरतीसाठी कोणती कागदपत्रे लागतील याची सुध्दा माहिती आणि तयारी असणे गरजेचं आहे.

काही विद्यार्थ्यांना कागदपत्रे कोणती पाहिजेत हे माहिती असून सुद्धा ऐन वेळी गोंधळ निर्माण होतो. आपली कागदपत्रे कुठे ठेवलेली आहेत ते आठवत नाही किंबहुना ती सापडत नाहीत. म्हणूनच पोलीस भरती कागदपत्रे माहिती असण्यासोबतच ती तयार ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे.

2022 मध्ये पोलीस भरती होणार हे तर जवळ - जवळ निश्चित आहे म्हणून आपल्या शारीरिक आणि लेखी परीक्षेच्या तयारीसोबतच भरतीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे एकत्र करून एका फाईलमध्ये लावून फाईल नीट सांभाळून ठेवा जेणेकरून आयत्या वेळी गोंधळ होणार नाही.

आता नेमकी कोणती पोलीस भरती कागदपत्रे गरजेची आहेत ती बघूया. ही यादी बघा आणि एखादे कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर ते मिळवून ठेवा.

Maharashtra Police

येथे सांगितलेल्या कागदपत्रांपैकी काही ऑनलाईन अर्ज करत असताना लागणार आहेत.

हे पण वाचा : पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तके वाचावीत ?

हे पण वाचा : पोलीस भरतीसाठी उंची किती लागते ?

पोलीस भरती कागदपत्रे

  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी (ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करण्यासाठी)
  • जातीचा दाखला (आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर)
  • MS CIT प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेला जाताना एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. (पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक, आधारकार्ड यापैकी कोणतेही चालेल)
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात वैधता प्रमाणपत्र (जात पडताळणी)
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

वरील सर्व कागदपत्रे पोलीस भरतीसाठी आवश्यक असली तरी सुद्धा सर्व कागदपत्रे सर्वांसाठी गरजेची नाही जसे की SC/ST प्रवर्गाला नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्रची आवश्यकता भासत नाही. हे समजून घेणे गरजेचं आहे.

आशा करतो ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरेल आणि पोलीस भरती कागदपत्रे कोणती आहेत हे आपल्या लक्षात आले असेल. जर का आपल्याला प्रवर्गनुसार कोणती कागदपत्रे लागतील यामध्ये काही अडचण असेल तर आपण कमेंट करून विचारू सकता.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Amar Patil म्हणाले…
Mscit sertificate important ahe ka?
Ajay Chaitya म्हणाले…
Ho important ahe, pan jar apalyakade nasel tar nokari la lagalyanantar aplyala te milavinyasathi time dila jato.