ऑक्टोबर 2024 मध्ये भारत सरकारने पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अभिजात भाषा म्हणजे काय ?
अभिजात भाषा हा भारत सरकारकडून विशिष्ट भाषेला दिला जाणारा दर्जा आहे. हा दर्जा ज्या भाषेला देण्यात येतो त्या - त्या राज्याला त्या भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येते. एखादी भाषा अभिजात आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी विविध निकष तपासले जातात आणि ते निकष पूर्ण करणाऱ्या भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येतो.
अभिजात भाषा कशी ठरते ?
पुरातन साहित्य: संबंधित भाषेचा इतिहास किमान 1500 ते 2000 वर्षांचा असावा आणि तिचे प्राचीन साहित्य आजही उपलब्ध असावे.
समृद्ध साहित्य परंपरा: या भाषेत असे साहित्य असावे जे प्राचीन काळापासून अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात आहे आणि त्याचे महत्त्व सिद्ध झालेले आहे.
मूळ भाषा: संबंधित भाषा स्वतःची स्वतंत्र असावी, म्हणजेच इतर कोणत्याही भाषेपासून थेट उधार घेतलेली नसावी.
सांस्कृतिक महत्त्व: भाषा त्या समाजातील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असावी.
अभिजात भाषा मराठी
तब्बल अकरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा प्राप्त झाला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने अनेक वर्षांची लढाई आता यशस्वी झाली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बठकीमध्ये मराठीसोबतच इतर चार भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळणारी मराठी ही सातवी भाषा आहे. अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेला कोणते फायदे होतील.
मराठी भाषेचे व्याकरण त्यामधील नवे प्रवाह आणि संपूर्ण नव्या जगाची भाषा या दृष्टिकोनातून भाषेचा विकास कसा करता येईल याविषयीचा आराखडा तयार करणे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे अनुवादाची क्षेत्रे विस्तीर्ण होणार आहेत. त्यामध्ये मराठी मधील सर्वोत्तम अशा 100 ग्रंथांचे अन्य 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करून घेणे आवश्यक ठरणार आहे. त्याचप्रमाणे अन्य भारतीय भाषांमधील शंभर पुस्तकांचे मराठी मध्ये अनुवाद करणे आवश्यक ठरणार आहे.
आधुनिक युगातील मराठी भाषेची विस्तीर्ण क्षितिजे या विषयावर सविस्तर चर्चा संशोधन आणि अभ्यास घडणे आवश्यक ठरणार आहे.
भारतात किती भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे ?
2024 पूर्वी तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता. मात्र 2024 मध्ये मराठी, पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत मध्ये पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता भारतामध्ये एकूण 11 अभिजात भाषा झाल्या आहेत.
अभिजात भाषा लिस्ट
- तमिळ - 2004
- संस्कृत - 2005
- तेलगू - 2008
- कन्नड - 2008
- मल्याळम - 2013
- उडिया - 2014
- मराठी - 2024
- पाली - 2024
- बंगाली - 2024
- आसामी - 2024
- प्राकृत - 2024
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने कोणते फायदे मिळतात ?
अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५०-३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.
भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची स्थापना केली जाते.
प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं. भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार.
0 टिप्पण्या