Maharashtra Police Bharti 2024 Online Form Date in Marathi

Maharashtra Police Bharti 2024 Online Form Date in Marathi

महाराष्ट्र पोलीस विभागाने  एकूण 16190 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशितकेली असून भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

या भरतीमधून पोलीस शिपाई (Police Constable), पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen), पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver), पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF), कारागृह शिपाई (Prison Constable) या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

एकूण : 16190 जागा

शैक्षणिक पात्रता

  • पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
  • पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

(शारीरिक पात्रता) Maharashtra Police Bharti Physical Eligibility

पोलीस भरतीमध्ये पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी पोलीस शिपाई या पदासाठी उंचीचे निकष पुढीलप्रमाणे.

महिला (Female) : महिला उमेदवारांची कमीत कमी उंची ही 155 CM इतकी असावी

पुरुष (Male) : पुरुष उमेदवारांची कमीत कमी उंची ही 165 CM इतकी असावी.

छाती

पुरुष : पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.

महिला : महिलांसाठी लागू नाही.

वयाची अट

31 मार्च 2024 रोजी (मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट)

  • पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

Fee

खुला प्रवर्ग: 450/- (मागास प्रवर्ग: ₹350/-)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2024

जाहिरात पाहा

Apply Online

Maharashtra Police Bharti 2024 Age Limit

भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा ही कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २८ वर्षे असणे आवश्यक आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे राखीव प्रवर्गाला सूट देण्यात आलेली . सूट किती आणि कशी असेल हे मूळ जाहिरात आल्यानंतरच कळू शकेल.

Maharashtra Police Bharti 2024 Online Form Last Date

5 मार्च 2024 पासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे , तर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 31 मार्च 2024 आहे. यानंतर ऑनलाईन अर्ज प्रणाली बंद करण्यात येईल.

पोलीस भरती संदर्भात इतर महत्वाच्या पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या