शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेची सुरुवात करण्यात आली. देशामध्ये विविध राज्यांकडून ही परीक्षा घेतली जाते. प्रत्येक राज्याकडून ही परीक्षा वेगवेगळ्या प्रकारे घेतली जाते तसेच त्यांना वेगवेगळ्या नावानेही ओळखले जाते.
जसे उत्तर प्रदेश मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेला UPTET सांगितले जाते त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा Maha TET म्हणून ओळखली जाते.
शिक्षक होण्यासाठी ही परीक्षा अनिवार्य असल्याने TET Exam Qualification Details या पोस्ट मध्ये समजून घेणार आहोत, सोबतच या परीक्षेसंदर्भात इतर माहिती सुध्दा घेणार आहोत.
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे काय?
राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी शिक्षकांची परीक्षा घेण्यात येते. जर आपल्याला कोणत्याही सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करायची असेल तर या परीक्षेमध्ये आपल्याला पात्र होने आवश्यक असते.
ही परीक्षा शिक्षकांची पात्रता तपासण्यासाठी घेण्यात येत असल्याने याला शिक्षक पात्रता परीक्षा सांगण्यात येते.
TET चा पूर्ण फॉर्म काय आहे?
राज्यामार्फत घेण्यात येणाऱ्या या शिक्षक पात्रता परीक्षेला TET सुद्धा सांगण्यात येते, याचा पूर्ण फॉर्म Teacher Eligibility Test असा आहे. तर प्रत्येक राज्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा पूर्ण फॉर्म वेगळा असू शकतो. जसे महाराष्ट्रामध्ये Maha TET चा अर्थ Maharashtra Teacher Eligibility Test असा होतो.
हे पण वाचा : CTET परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके | Arihant CTET Exam Books
हे पण वाचा : Maha Tet Books In Marathi | परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके
महाराष्ट्र TET परीक्षेसाठी कोण पात्र आहे?
TET परीक्षेसाठी D.Ed तसेच B.Ed किंवा यांना समतुल्य असणारा डिप्लोमा / पदवी असलेला कोणताही उमेदवार पात्र असतो.
मात्र TET मध्ये दोन पेपरसाठी परीक्षा घेण्यात येते. इयत्ता पहिली ते पाचवी साठी पेपर एक आणि इयत्ता सहावी ते आठवी साठी पेपर दोन त्यामुळे दोन्हीसाठी आवश्यक असणारी Qualification वेगवेगळी आहे.
पेपर एक साठी आपण किमान बारावी आणि सोबत D.Ed किंवा त्याला समतुल्य असलेला डिप्लोमा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तर पेपर दोन साठी पदवी अभ्यासक्रमासोबत B.Ed किंवा त्याला समतुल्य अभ्यासक्रम किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
TET परीक्षेचे महत्त्व काय आहे?
शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण प्राप्त व्हावे सोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेमध्ये चांगले शिक्षक असणे आवश्यक आहे.
हे उद्दिष्ट साध्य करून शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी TET परीक्षेची सुरुवात करण्यात आली आणि त्यामुळेच TET परीक्षेला अधिक महत्व प्राप्त होते.
TET आणि CTET मध्ये काय फरक आहे?
TET परीक्षा ही राज्यामार्फत घेण्यात येते आणि ही परीक्षा पात्र असरणारा उमेदवार राज्याकडून चालविण्यात येणाऱ्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करण्यास पात्र असतो. ज्या राज्याच्या TET मध्ये आपण पात्र असाल त्याचा वापर आपण फक्त त्याच राज्याच्या शाळेमध्ये नोकरीसाठी करू सकता
तर CTET ही परीक्षा केंद्र शासनाकडून राबविण्यात येते तसेच ही परीक्षा पात्र असल्यास आपण केंद्र शासनाच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करण्यास पात्र ठरता.
CTET पात्र असल्यास आपण कोणत्याही राज्यामध्ये केंद्र शासनाच्या शाळेमध्ये नोकरी मिळवू शकता.
या पोस्ट मध्ये आपल्याला TET Exam Qualification Details सोबतच इतर माहितीसुध्दा उपयुक्त वाटली असेल असी आशा आहे. TET आणि CTET संदर्भातील वरील पोस्ट सुध्दा नक्की वाचा.
0 टिप्पण्या