महाराष्ट्रामध्ये शेवटची मोठी शिक्षक भरती कधी झालेली आहे बऱ्याच जणांना आठवणार सुध्दा नाही. मागील काही वर्षांमध्ये आपण D.Ed, B.Ed करून शिक्षक भरती कधी होईल याची वाट बघत बसले असतील, तर आपल्या डोक्यात नक्कीच एक प्रश्न आला असेल.
तो म्हणजे वयासंबंधीचा की, शिक्षक भरतीसाठी वयोमर्यादा काय असते? तर या पोस्ट मध्ये आपण या प्रश्नासोबत इतर माहिती सुध्दा घेणार आहोत.
शिक्षक भरती कधी होणार?
शिक्षक भरती बद्दल आपण बघतच आहेत प्रवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करून घेतली जाणार आहे आणि अनेक व्यक्तींना यामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोबतच काही गैरव्यवहार झाल्याच्याही आपण बातम्या बघितल्या असतील.
पण सध्या तरी मात्र मोठी भरती एकत्रितपणे घेतली जाईल असे दिसत नाही आहे. मागील वर्षी मागील वर्षी 2023 मध्ये 30,000 जागांसाठी शिक्षक भरती होईल असे सांगण्यात आले परंतु त्याबद्दल काय झाले हे आपल्याला माहिती आहेच.
भारतातील सरकारी शिक्षकांची वयोमर्यादा किती आहे?
वेगवेगळ्या राज्यात घेतली जाणारी शिक्षक भरती आणि मागील भरती जाहिरातींचा विचार केला तर शिक्षक भरतीसाठी उच्च वयोमर्यादा ही 45 वर्षे ते 50 वर्षे असते. म्हणजे जर आपले वय यापेक्षा कमी असेल तर आपण नक्कीच सरकारी शिक्षक होण्यास पात्र होऊ सकता, अर्थातच इतर पत्रतेमाध्येही बसने आवश्यक आहे.
भारतात शिक्षकांची भरती कशी केली जाते?
साधारणपणे सरकारी शिक्षक भरती ही स्पर्धा परीक्षेमार्फतच घेतली जाते परंतु काही खाजगी संस्थेमार्फत थेट मुलाखतीद्वारे सुद्धा शिक्षक भरती करून घेतले जात असतात.
स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश मिळविणाऱ्या उमेदवारांना शिक्षक म्हणून नोकरी करण्याची संधी उपलब्ध होते.
शिक्षक होण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहेत?
शिक्षक म्हणजे D.Ed, B.Ed आलेच, जर आपल्याला प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करायची असल्यास किमान बारावी सोबत D.Ed किंवा समतुल्य डिप्लोमा आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
सोबतच माध्यमिक शाळेसाठी आपल्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी आणि B.Ed किंवा त्याला समतुल्य असणारी पदवी असणे आवश्यक आहे.
या व्यतिरिक्त प्राथमिक आणि माध्यमिक दोन्हीसाठी CTET किंवा संबंधित राज्याची TET पात्र असणे बंधनकारक आहे.
हे पण वाचा : CTET परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके
हे पण वाचा : Maha TET Books List
0 टिप्पण्या