सेट परीक्षा माहिती : पात्रता, अभ्यासक्रम आणि इतर काही मुद्दे

जर आपण पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतली असेल किंवा घेत असाल तर नक्कीच सेट (SET) परीक्षेबद्दल ऐकलं किंवा वाचलं असेल. सहाय्यक प्राध्यापक बनण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा खूप महत्वाची असते.

म्हणूनच सेट परीक्षा म्हणजे काय? त्यासाठी आवश्यक पात्रता आणि परीक्षेसंदर्भातील इतर माहिती या पोस्टमध्ये घेणार आहोत.

सेट परीक्षा म्हणजे काय ?

सेट परीक्षा म्हणजे राज्य पात्रता परीक्षा, इंग्रजीमध्ये या परीक्षेला State Eligibility Test असे सांगण्यात येते आणि यावरूनच या परीक्षेला SET (सेट) असे सांगण्यात येते. ही परीक्षा विद्यापीठामध्ये किंवा सिनिअर कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) होण्यासाठी पात्रता परीक्षा म्हणून घेतली जाते.

सेट परीक्षा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना पात्रता प्रमाणपत्र देण्यात येते, याचा वापर करून उमेदवार असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी मिळवू शकतात.

सेट परीक्षा माहिती

सेट परीक्षेसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?

सेट परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे.

जे उमेदवार OBC / SEBC / SBC / DT(VJ) / NT and SC / ST / Trans-genders अपंग आणि अनाथ या प्रवर्गामध्ये मोडत असतील असा उमेदवारांना पात्रतेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष अभ्यासक्रमात किमान 50% गुण असणे आवश्यक आहे. 

तर जे उमेदवार वरील प्रवर्गामध्ये मोडत नसतील असा उमेदवारांना पात्रतेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष अभ्यासक्रमात किमान 55% गुण असणे आवश्यक आहे.

पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष असभ्यसक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये शिकणारे उमेदवारसुद्धा ही परीक्षा देण्यासाठी पात्र असतील. मात्र त्यांना आपले शिक्षण आपल्या प्रवर्गानुसार 50% किंवा 55% नी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

Age Limit for SET Exam Maharashtra

सेट परीक्षेसाठी उच्च वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही, परंतु उमेदवाराचे किमान वय 17 वर्षे असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा : शिक्षक भरती वयोमर्यादा काय असते ?

सेट एक्साम किती मार्क्स ची असते?

सेट परीक्षा ही ऑब्जेक्टिव पद्धतीने ऑफलाईन घेतली जाते. परीक्षेमध्ये उमेदवारांना दोन पेपर द्यावे लागतात. दोन्ही पेपर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या सत्रात घेतले जातात.

पेपर 1 : पहिल्या पेपरमध्ये उमेदवारांना 100 गुणांसाठी 50 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात व ते सोडविण्यासाठी 1 तासाचा वेळ देण्यात येतो.

पेपर 2 : दुसऱ्या पेपरमध्ये उमेदवारांना 200 गुणांसाठी 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात व ते सोडविण्यासाठी 2 तासाचा वेळ देण्यात येतो.

सेट परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग असते का?

युजीसी कडून सेट परीक्षेसाठी नेगेटिव्ह मार्किंग निश्चित करण्यात आलेली नाही त्यामुळे सेट परीक्षेत कोणत्याही प्रकारची नेगेटिव्ह मार्किंग नसते.

सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता आहे?

सेट परीक्षा पात्र होऊन असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना दोन्ही पेपर देऊन किमान 40% गुण मिळविणे आवश्यक आहे.

तर OBC / SEBC / SBC / DT(VJ) / NT and SC / ST / Trans-genders अपंग आणि अनाथ यांना सेट परीक्षा पात्र होऊन असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी दोन्ही पेपर देऊन किमान 35% गुण मिळविणे आवश्यक आहे.

सेट परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

सेट परीक्षेमध्ये उमेदवाराला आपल्या पदव्युत्तर पदवीच्या विषयानुसार पेपर द्यावे लागतात. त्यामुळे सर्वच उमेदवारांना आपल्या विषयाचा अभ्यासक्रम सहज मिळावा यासाठी प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://setexam.unipune.ac.in/SyllabusOfPapers.aspx

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या