तलाठी भरती पात्रता काय असते ? शैक्षणिक तसेच इतर पात्रता

महाराष्ट्र शासनाकडून विविध विभागामध्ये भरती प्रक्रिया राबविल्या जातात. या विभागांपैकी महसूल विभागातील तलाठी भरती सुध्दा शासनाकडूनच घेण्यात येते.

शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या या भरतीसाठी आपण अर्ज करण्याचा विचार करत आहेत आणि त्यासाठी आवश्यक पात्रता कोणती याची माहिती मिळविण्यासाठी आपण येथे आला असाल तर योग्य ठिकाणी आलेले आहात.

या पोस्ट मध्ये आपण तलाठी भरतीसाठी आवश्यक पात्रता कोणती असते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, यावरून आपल्याला शैक्षणिक आणि वयाची पात्रता काय असते हे समजणार आहे.

तलाठी भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असल्यामुळे यासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जात नाही. झालेल्या परीक्षेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जात असते.

हे पण वाचा : Talathi Previous Year Question Paper

विभाग : महसूल विभाग

वेतन श्रेणी : 9300-34800

तलाठी भरती 2023 अजूनही जाहीर झाली नसली तरी ती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पात्रतेच्या नियमांबद्दल जाहिरात आल्यानंतरच खात्रीशीर माहिती मिळणार आहे, परंतु तरी सुध्दा आधी झालेल्या भरतीच्या नियमानुसार याठिकाणी पात्रता बघून घेऊया.

तलाठी भरती पात्रता

तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कोणती असते ?

तलाठी भरतीसाठी पदवी पूर्ण असणे आवश्यक असते, कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण झालेला उमेदवार या भरतीसाठी पात्र असतो.

कमीत कमी शिक्षण पदवी असले तरी जास्तीत जास्त शिक्षणाची कोणतीही मर्यादा येथे देण्यात आलेली नाही.

तलाठी भरतीसाठी वयोमर्यादा किती ?

तलाठी भरतीसाठी कमीत कमी 18 वर्षे तर जास्तीत जास्त 38 वर्षे असलेले उमेदवार पात्र असतात. मागास व आरक्षित प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट असल्यामुळे त्यांच्यासाठी उच्च वयोमर्यादा ही 43 वर्षे असते.

वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास तलाठी भरती परीक्षा देता येत नाही.

हे पण वाचा : तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

हे पण वाचा : Talathi Bharti 2023 Online Form Date

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या