तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?

तलाठी हे एक असं पद आहे ज्याच्या भरतीची आपल्यासारखे अनेक विद्यार्थी वाट बघत होते. अखेर आता ही भरती घेण्यात येणार आहे, या भरतीसाठी आपणही तयारी केली असेलच.

भरतीच्या सर्व तयारीमध्ये एक महत्वाचं काम म्हणजे आपले कागदपत्र तयार करून ठेवणे, जेणेकरून भरती सुरु झाल्यावर आपल्याला त्यांची पूर्तता करून नोकरी मिळवता येईल.

जर आपल्याला तलाठी भरतीसाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक असतात याची माहिती हवी असेल तर आपण योग्य ठिकाणी आलेले आहात, या पोस्ट मध्ये आपण हीच माहिती घेणार आहोत.

तलाठी भरतीच्या कागदपत्रांची ही यादी भरतीच्या प्रारूप जाहिरातीमधून घेण्यात आलेली आहे, त्यामुळे ही यादी पूर्ण खात्रीशीर असणार आहे.

या पोस्टमध्ये देण्यात आलेली सर्व कागदपत्रे  भरतीसाठी आवश्यक असणार आहेत, फक्त फरक एवढाच की ही सर्व कागदपत्रे सर्वांसाठी लागू होणार नाहीत.

त्यामुळे खाली देण्यात आलेल्या कागदपत्रांपैकी कोणती कागदपत्रे आपल्याला लागू होतील हे आपण समजून घ्यायचे आहे. (उदा. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सर्वांना लागू होत नाही.)

Talathi Bharti 2023

या वर्षी घेण्यात येणाऱ्या भरती मध्ये ही सर्व कागदपत्रे आपल्याला PDF स्वरुपात अपलोड करावी लागणार आहेत, त्यामुळे शक्य असल्यास वेळ वाचविण्यासाठी आपली कागदपत्रे आधीच स्कॅन करून ठेवू शकता.

हे पण वाचा : Talathi Previous Year Question Paper

हे पण वाचा : तलाठी भरतीसाठी पात्रता काय असते ?

तलाठी भरती कागदपत्रे

  • अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
  • वयाचा पुरावा (आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, जन्म प्रमाणपत्र)
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
  • आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
  • अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  • अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
  • एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • MS-CIT प्रमाणपत्र

या सर्व कागदपत्रांमध्ये MS-CIT च्या प्रमाणपत्राविषयी अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे की जर MS-CIT चं प्रमाणपत्र नसेल तर फॉर्म भरता येईल की नाही. कारण अनेक विद्यार्थ्यांनी अजूनही MS-CIT केलेली नाही.

तर आपल्याला यासाठी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता नाही, जर आपल्याकडे MS-CIT चं प्रमाणपत्र नसेल तरी आपल्याला फॉर्म भारता येणार आहे. मात्र निवड झाल्याच्या दोन वर्षांच्या कालावधीत हे प्रमाणपत्र मिळवणे अनिवार्य असणार आहे.

ही पोस्ट आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या