ए.पी.जे. अब्दुल कलाम माहिती मराठी मध्ये

apj-adbul-kalam-mahiti-marathi

Dr. APJ Abdul Kalam Information In Marathi

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम हे 2002 ते 2007 या काळात भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. राष्ट्रपती होण्याआधी त्यांनी अनेक गोष्टी आपल्या देशाला दिलेल्या आहेत. त्यांनी अंतराळ संशोधनात दिलेले योगदान भारत देशामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत आठवणीत ठेवले जाईल.

असाच महान व्यक्तींबद्दल या पोस्ट मध्ये आपण माहिती घेणार आहोत, त्यांच्या जीवनातील अनेक अनुभव त्यांनी जगासमोर मांडलेले आहेत. ते सर्व विचार आपल्याला या एका लहानसा पोस्ट मध्ये लिहिता येणार नाही .

म्हणूनच त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या घडामोडी आणि अनुभव आपण याठिकाणी बघणार आहोत.

आपण ज्यांना ए.पी.जे अब्दुल कलाम म्हणून ओळखतो त्यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दिन कलाम असे आहे. ते भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते.कलाम यांनी तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला.

त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) येथे काम केले. तसेच 2002 ते 2007 पर्यंत भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणूनही त्यांनी काम केले होते.

भारताचा नागरी अंतराळ कार्यक्रम आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासामध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी केलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (Ballistic Missile) आणि प्रक्षेपण वाहन (Launch Vehicle) तंत्रज्ञानाच्या विकास कामामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले.

सुरुवातीचे जीवन

कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू मधील रामेश्वरम येथे झाला. त्यांचे वडील जैनुलाब्दिन मारकायर हे स्थानिक मशिदीचे इमाम होते, तसेच ते नदीवरील बोटीचे मालक सुध्दा होते. कलाम यांची आई आशिअम्मा गृहिणी होत्या.

त्यांचे वडील बोटीतून यात्रेकरूंना रामेश्वरम ला घेऊन जाण्याचे काम करत होते. चार भाऊ आणि एक बहिण यामध्ये सर्वात लहान कलाम होते.

त्यांचे पूर्वज हे श्रीमंत मारकायर व्यापारी आणि जमिनीचे मालक असल्याने त्यांच्याकडे असंख्य मालमत्ता आणि जमिनी होत्या. त्यांचे पूर्वज श्रीमंत असले तरीही 1920 चे दशक येईपर्यंत त्यांच्या कुटुंबाने आपली बहुतेक संपत्ती गमावली होती.

त्यामुळे कलाम यांचा जन्म होईपर्यंत कलाम यांचे कुटुंब गरीब झाले होते. कुटुंबाच्या तुटपुंज्या उत्पन्नात भर पडावी म्हणून त्यांनी लहानपणी वर्तमानपत्रेही विकली.

हे पण वाचा : Motivational Books for Students in Marathi

हे पण वाचा : विद्यार्थ्यांसाठी डॉ. कलाम यांची पुस्तके

शिक्षणाची वाटचाल

सुरुवातीच्या शालेय शिक्षणामध्ये त्यांना सरासरी गुण मिळायचे, परंतु त्यांना शिकण्याची तीव्र इच्छा असल्याने त्यांना तेजस्वी आणि मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे. ते अभ्यासामध्ये बराच वेळ घालवायचे त्यांना गणिताची विशेष आवड होती.

श्वार्ट्झ हायर सेकंडरी स्कूल, रामनाथपूरम येथे त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतर मद्रास विद्यापीठाशी संलग्न असलेले सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथे प्रवेश घेतला. तेथूनच त्यांनी 1954 मध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये पदवी मिळवली.

त्यांना पुढे एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास करायचा होता म्हणून ते 1955 साली मद्रास येथे गेले. कलाम आपल्या वरिष्ठ वर्गात असताना एका प्रकल्पावर काम करत होते. परंतु डीन त्यांच्या प्रगतीच्या अभावामुळे असमाधानी होते.

त्यामुळे त्यांना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तिन दिवसांची मुदत दिली आणि दिलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण झाला नाही तर, त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती रद्द करण्याची धमकी दिली. परंतु अंतिम मुदत पूर्ण करून डीनला प्रभावित केले.

त्यांना फायटर पायलट व्हायचे होते परंतु त्यांचे हे स्वप्न थोडक्यात चुकले, कारण ते पात्रता फेरीमध्ये नानाव्या स्थानावर होते आणि आयएएफमध्ये फक्त आठ जागा उपलब्ध होत्या.

शास्त्रज्ञ म्हणून कार्य

1960 मध्ये त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून पदवी घेतली आणि नंतर संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (DRDS) चे सदस्य बनले. नंतर पुढे ते संरक्षण आणि विकास संस्थेच्या रोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून सामील झाले.

कलाम हे प्रशिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या INCOSPAR समितीचा भाग होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक लहान हॉवरक्राफ्ट डिझाईन करून केली.

1963 ते 1964 मध्ये कलाम यांनी नासाचे लँगली संशोधन केंद्र, ग्रीनबेल्ट, मेरीलँडमधील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर आणि वॉलॉप्स फ्लाइट सुविधा या केंद्रांना भेटी दिल्या.

1969 साली त्यांची बदली भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये करण्यात आली. इस्रो मध्ये ते भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन (SLV-III) चे प्रकल्प संचालक होते. नंतर याच प्रक्षेपण वाहनाचा वापर करून जुलै 1980 मध्ये रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वीरीत्या तैनात केला.

1965 मध्ये कलाम यांनी पहिल्यांदा डीआरडीओ येथे स्वतंत्रपणे विस्तारित रॉकेट प्रकल्पावर काम सुरु केले. नंतर 1969 मध्ये त्यांना सरकारची मान्यता मिळाली. त्यामुळे त्यांनी अधिक अभियंते समाविष्ट करण्यासाठी कार्यक्रमाचा विस्तार केला.

1970 ते 1990 च्या दरम्यान कलामांनी पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) आणि SLV-III प्रकल्प यशस्वीरीत्या विकसित केला. 1980 च्या दशकात त्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन नेतृत्वामुळे मोठी प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळाली.

जुलै 1992 ते डिसेंबर 1999 या कालावधीमध्ये कलाम यांनी पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानि सल्लागार तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसाठी सचिव म्हणूनही काम केले.

पोखरण II या अणुचाचण्या याच काळात घेण्यात आल्या ज्यामध्ये त्यांनी राजकीय आणि तांत्रिक भूमिका बजावली. कलाम हे या चाचण्यांसाठी राजगोपाल चिदंबरम यांच्यासह मुख्य प्रकल्प समन्वयक म्हणून काम करत होते.

1998 मध्ये हृदयरोगतज्ज्ञ सोमा राजू आणि कलाम यांनी मिळून "कलाम-राजू स्टेंट" नावाचा कोरोनरी स्टेंट विकसित केला, जो कमी किमतीमध्ये उपलब्ध होऊ सकत होता.

राष्ट्रपती पदी निवड

अब्दुल कलाम हे के. आर. नारायण यांच्यानंतर भारताचे 11 वे राष्ट्रपती बनले. त्यांनी 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्य केले.

कलाम हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते ज्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला होता. ते राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. याआधी सर्वपल्ली राधाकृष्णन (1954) आणि झाकीर हुसेन (1963) यांना भारतरत्न देण्यात आला होता जे नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती भवनामध्ये प्रवेश करणारे ते पहिले वैज्ञानिक आणि पहिले पदवीधर राष्ट्रपती देखील होते.

गौरव / पुरस्कार

कलाम यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. ते पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.

अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.

भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार

  • 1981 : पद्मभूषण (भारत सरकार) - 1981
  • 1990 : पद्मविभूषण (भारत सरकार) - 1990
  • 1998 : भारतरत्न (भारत सरकार) - 1998
  • 1997 : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार (भारत सरकार) - 1997
  • 1998 : वीर सावरकर पुरस्कार (भारत सरकार) - 1998
  • 2000 :रामानुजम पुरस्कार (मद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर) - 2000
  • 2007 : किंग चार्ल्स (दुसरा) पदक (ब्रिटिश रॉयल सोसायटी) - 2007
  • 2007 : डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी (वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठ, U.K) - 2007
  • 2008 : डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग (Honoris Causa) (नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर) - 2008
  • 2009 : हूवर पदक (ASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)) - 2009
  • 2009 : आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कार (कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A) - 2009
  • 2010 : डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग (वॉटरलू विद्यापीठ) - 2010
  • 2011 : न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व. (IEEE)
  • 2012 : आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये कलाम दुसऱ्या क्रमांकावर होते
  • 2015 सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.

कलाम यांनी लिहिलेली पुस्तके

कलाम यांनी आपल्या अनुभवांचा वापर करून अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. ही पुस्तके विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य व्यक्तींना सुध्दा खूप चांगली शिकवण देण्याची क्षमता ठेवून आहेत.

कलाम यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी

ही पुस्तके आपल्याला वाचण्यासाठी उपलब्ध व्हावीत या उद्देशाने काही पुस्तकांची लिंक येथे देण्यात आलेली आहे. आपल्याला हवी असल्यास दिलेल्या लिंकचा वापर करून थेट अॅमेझॉन वरून पुस्तके ऑर्डर करू सकता.

निधन

ए.पी.जे. अब्दुल कलाम २७ जुलै २०१५ रोजी कलाम शिलॉंग येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे "पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे" या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले. पायरीवरून जात असताना त्यांना काही अस्वस्थ वाटले, परंतु थोड्या विश्रांतीनंतर सभागृहात प्रवेश करण्यास सक्षम झाले.

संध्याकाळी सुमारे साडेसाहा वाजता व्याख्यान देताना ते स्टेज वरून कोसळले. त्यांना जवळच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; आगमनानंतर त्यांच्यात नाडी किंवा जीवनाची इतर चिन्हे दिसली नाहीत. आयसीयूत युनिट मध्ये ठेवण्यात आले तरी कलाम यांना ७-४५ला हृदयविकाराच्या दुसऱ्यायानंतर मृत घोषित करण्यात आले.

रामेश्वरम येथे त्यांचे पार्थिव शरीर स्थानिक बस स्टेशनच्या समोर खुल्या भागामध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते/ 30 जुलै 2015 रोजी पंतप्रधान, तामिळनाडुचे राज्यपाल आणि कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशचे मुख्य मंत्री यांच्यासह 350,000 हून अधिक लोक याठिकाणी उपस्थित होते.

माझे मत

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विषयी काही मोजक्या शब्दामध्ये लिहिणे हे खूप कठीण काम आहे, फक्त त्यांच्या कार्याबद्दल जरी लिहायचे झाले तरी अनेक ब्लॉग पोस्ट लिहाव्या लगातील आणि तरी सुध्दा आपण त्यांच्याबद्दल लिहिण्यास कमी पडू असे मला वाटते.

म्हणून ए.पी.जे. अब्दुल कलाम माहिती मराठी मध्ये लिहिण्यास मी नक्कीच कुठे तरी कमी पडलो असेन, पण तरीही ही एवढी माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल अशी आशा करतो.

अशीच पोस्ट वाचण्यासाठी नेहमी भेट देत राहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या