Motivational Books for Students in Marathi

Motivational Books for Students in Marathi

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पुस्तके

नियमित केलेले वाचन आपल्याला ज्ञानात नेहमी वाढ करत असते, अनेक वेळेस फक्त आत्मसात केलेले ज्ञान काही उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी पुरेसे नसते तर आपल्याला प्रेरणा मिळणेही तितकेच महत्वाचे असते.

विविध माध्यमातून आपण प्रेरणा मिळविण्याचा प्रयत्न करत असतो, या प्रयत्नामध्ये आपल्याला सर्वात जास्त मदत कुणाची मिळत असेल तर ती म्हणजे पुस्तकांची म्हणूनच या पोस्ट मध्ये आपण सर्व विद्यार्थी मित्रांना फायदेशीर ठरतील असा काही पुस्तकांची माहिती बघणार आहोत.

मराठी पुस्तकांची नावे

1. मन में है विश्वास

2. अग्निपंख

3. माझी आत्मकथा

4. मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा

5. The Psychology of Money

Man mein hai vishwas book

किंमत बघा

मन में है विश्वास

हे पुस्तक पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेले आहे यांचे विचार फक्त विद्यार्थीच नाही तर इतर व्यक्तींसाठीही प्रेरणादायी ठरतील असे आहेत. विश्वास नांगरे पाटील यांचे विचार आणि आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे.

ग्रामीण भागातून पुढे येऊन त्यांनी घेतलेली गगन भरारी अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे. जर आपण ग्रामीण भागातून असाल, मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले असेल किंवा पोलीस दलात आपल्याला नोकरी करायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.

विश्वास नांगरे पाटील यांचा प्रवास बघून आपल्याला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल.

किंमत बघा

अग्निपंख

मिसाईल मेन म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा संपूर्ण जीवन प्रवास खूपच प्रेरणादायी असा आहे. त्यांच्या अग्निपंख या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या घडामोडींचा उल्लेख केलेला आहे.

त्यांचे बालपण, शाळेपासून तर ते राष्ट्रपती होईपर्यंतचा प्रवास या पुस्तकात रेखाटण्यात आलेला आहे. हे पुस्तक फक्त विद्यार्थ्यालाच नाही तर प्रत्येक व्यक्तीला नवचेतना देऊन जाते. म्हणूनच कदाचित शाळा/कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनाबक्षिस म्हणून हे पुस्तक दिले जाते.

किंमत बघा

माझी आत्मकथा

भारतामध्ये अनेक महान समाजसुधारक होऊन गेले आहेत यापैकीच एक म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांचे चरित्र या पुस्तकामधून अनुभवायला मिळते.

बाबासाहेबांना चरित्र स्वत: लिहिणे कधी जमलेच नाही कारण त्यांना कामाच्या व्यापातून वेळच काढता आला नाही. असे असले तरी लेखक ज. गो. संत यांनी बाबासाहेबांचे अनेक लेख या पुस्तकामध्ये समाविष्ट केले आहेत.

प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबांचे हे प्रेरणादायी पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे.

किंमत बघा

हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ़्लुअन्स पीपल

डेल कार्नेजी हे असे लेखक आहेत जे आपल्या लेखनातून अनेकांच्या जीवनाला नवी दिशा देत असतात. असाच पुस्तकांपैकी एक म्हणजे मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा.

जर आपल्याला संवादामध्ये चांगले व्हायचे असेल लोकांवर चांगली छाप पडायची असेल तर आपण हे पुस्तक नक्की वाचायला हवे. कारण आपण आपल्या संपूर्ण जीवनात अनेक व्यक्तींना भेटतो, या लोकांसोबत जर आपण चांगल्या प्रकारे संवाद करू शकलो तर त्याचा आपल्या सोबतच समोरच्या व्यक्तीच्याही जीवनात चांगले परिणाम होतात.

किंमत बघा

The Psychology of Money

पैसांचे मानसशास्त्र समजावणारे हे पुस्तक पैसासी संबंधित अनेक सत्य आपल्याला समजावते आणि काही गैरसमज अगदी सुलभ सोप्या भाषेत उलगडून सांगते.

पैसांचा वापर प्रत्यक्ष आयुष्यात कशाप्रकारे करायचे हे अनेक उदाहरणाद्वारे सांगण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनी हे पुस्तक व्यवस्थित समजून घेतल्यास त्यांना पुढील आयुष्यात आर्थिक व्यवहार करताना जास्त अडचणी जाणवणार नाहीत.

वरील सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी ठरतील असा आहेत. या प्रेरणादायी पुस्तकांच्या व्यतिरिक्त इतर कोणती पुस्तके आपल्याला आवडतात ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल त्यामुळे कमेंट नक्की करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या