भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ. अवुल पाकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) हे आपल्या विज्ञानातील योगदानासाठी जगभरात प्रसिध्द आहेत. मिसाईल निर्मितीमध्ये त्यांनी दिलेले योगदान हे संपूर्ण भारत देशासाठी अविस्मरणीय आहे आणि यामुळेच त्यांना "Missile Man of India" म्हणूनही ओळखले जाते.
दारारात जाऊन पेपर विकण्यापासून ते भारताचे राष्ट्रपती होण्यापर्यंतचा त्यांचे पूर्ण जीवनप्रवाश प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रोत्साहन देणारे आहे. भारतरत्न मिळालेले हे व्यक्ती ज्यांनी आपल्या जीवनात भारतातील अनेक चढ-उतार बघितले आहेत, त्यांनी हे सर्व अनुभव अनेक पुस्तकांमध्ये उतरवले आहेत.
हे पण वाचा : Motivational Books For Students in Marathi
हे पण वाचा : ए.पी.जे अब्दुल कलाम माहिती मराठी मध्ये
त्यांच्या अनुभवावर आणि जीवनावर आधारित काही असी पुस्तके जी प्रत्येक विद्यार्थ्याने एकदा तरी नक्की वाचायला हवीत. ही पुस्तके फक्त त्यांच्या बद्दल माहिती देत नाहीत, तर आपल्याला यशस्वी होण्यासाठी ज्या मार्गावर चालायचे आहे त्यासाठी प्रोत्साहन देऊन जातात.
म्हणूनच या ठिकाणी काही पुस्तके देत आहे जी आपण मिळवून वाचू सकता.
APJ Abdul Kalam Books for Students
अग्निपंख - आत्मचरित्र
हे पुस्तक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आहे. या अत्माचारीत्रामध्ये त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या घडामोडींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जीवनात आलेल्या अडचणींवर मात करून पुढे चालत राहणे ई. मुद्दे विद्यार्थ्यांना त्यांच्या या पुस्तकामधून शिकता येतील.
ए.पी.जे. अब्दुल कलाम - माझी जीवनयात्रा
भारताचे अकरावे राष्ट्रपती यांनी या पुस्तकामध्ये आपली स्वप्ने साकारताना कोण-कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत यावर प्रकाश टाकलेला आहे. त्यांच्या लहानपणीपासून ते तरुणपणापर्यंत आलेल्या सर्व अडचणींचा कसा सामना केला याबद्दल त्यांनी लिहिलेले आहे.
त्यांच्या जीवनावरील ही पुस्तक विद्यार्थ्यांनी वाचली तर हल्ली निराशेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा तशी वेळ येणार नाही, याची मला खात्री वाटते.
टर्निंग पॉईंट्स - आव्हाने झेलत केलेली वाटचाल
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कलाम यांना कोणत्या अडचणी आल्या किंवा असा घटना घडल्या ज्या घटना पुढे जाऊन त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट्स बनल्या आणि त्यांच्याच बाबतीत या पुस्तकामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. या पुस्तकाच्या मदतीने विद्यार्थ्यांना ही गोष्ट समजायला सोपे जाईल की, कोणतीही घटना किंवा गोष्ट आपल्या जीवनावर कशी प्रभाव टाकू सकते.
असे घडवा तुमचे भविष्य
आपली दररोजची कामे, शिक्षण, समाज इत्यादी सर्व सांभाळत प्रत्येक व्यक्तीने / विद्यार्थ्याने आपले भविष्य कसे घडवले पाहिजे यासाठी या पुस्तकात खूप चांगली माहिती देण्यात आलेली आहे. या पुस्तकाच्या आधारे प्रत्येक विद्यार्थ्याला आपले भविष्य घडवण्यासाठी मदत नक्की मिळणार आहे.
वरील सर्व पुस्तके आपल्याला जवळच्या पुस्तकाच्या दुकानामध्ये किंवा शाळा/कॉलेज मधील वाचनालयात नक्की मिळतील त्यामुळे एक-एक पुस्तक निवडा आणि पूर्ण वाचून काढा. आणि फक्त वाचून काही होणार नाही आहे त्यामुळे आपण वाचलेले अनुभव कृतीत उतवण्याचा प्रयत्न करा यामुळेच आपले भविष्य चांगले होणार आहे.
पुस्तके ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याला हवी असल्यास थेट वरील लिंक वरून ऑर्डर करू सकता. ही पोस्ट आपल्याला उपयुक्त ठरेल असी आशा आहे आणि यामुळेच ही पोस्ट आपल्या विद्यार्थी मित्रासोबत सुद्धा शेयर करा.
0 टिप्पण्या