अभ्यास कसा करावा ? चला समजून घेऊया सोप्या शब्दात

Abhyas kasa karava

Abhyas kasa karava

आपण जर शाळा-कॉलेज मध्ये शिकत असाल किंवा शिकलेले असाल तर आपल्या लक्षात आले असेल की आपल्यापैकी अनेक जणांना "अभ्यास कसा करावा ?" हा प्रश्न नक्की पडला असेल.

विद्यार्थी मित्रांच्या जीवनातील हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जो विद्यार्थी या एका प्रश्नाचे उत्तर शोधून आणि समजून घेतो तो विद्यार्थी नेहमी पुढे असतो. कारण त्याला अभ्यासाची आवडच नाही तर सवय शुध्दा लागलेली असते.

म्हणूनचा या पोस्ट मध्ये आपण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पोस्ट पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला अभ्यास कसा केला पाहिजे हे समजणार आहे.

अभ्यासाला सोप्या भाषेत समजून घ्यायचे तर अभ्यास म्हणजे सराव! आणि सराव हा कधीतरी केला जात नाही तो सतत करावा लागत असतो.

सराव करत असताना आपल्याकडे एकाग्रता असणे खूप महत्वाचे आहे. एकाग्र मनाने केलेले कोणतेही काम हे नेहमी पूर्णत्वास येत असते. अनेक वेळेस एकाग्रतेमुळे खूप अवघड असलेली कामेही एकदम सहज वाटायला लागतात.

आता थेट काही मुख्य मुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यास कसा करावा ? हे समजून घेऊ.

वाचलेले लक्षात कसे ठेवावे ?

अनेक विद्यार्थ्यांची तक्रार असते की, अभ्यास करत असताना वाचलेले काहीच लक्षात राहत नाही. तर यासाठी आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल.

सर्वात आधी वर बघितल्याप्रमाणे आपलं मन एकाग्र करायला लागेल, कारण एकाग्र मनाने अभ्यास केल्यास अर्धे काम इथेच झालेले असेल.

मन एकाग्र करणे म्हणजेच आपले मन इतर कोणत्याही गोष्टीकडे आकर्षिले जाणार नाही याची काळजी घेणे. आणि त्यासाठी मोबाईल, टिव्ही आणि यासारख्या इतर गोष्टी आपल्या जवळ ठेवू नये. तसेच मन एकाग्र करण्याची इतर पद्धतींचा शुद्धा वापर करता येईल.

वाचलेल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करा काही आठवत नसेल तर परत वाचा. परत-परत वाचन झाल्याने त्या गोष्टी आपल्याला आठवण ठेवण्यास सोपे जाते.

वाचन झाल्यानंतर आपण जे काही वाचलेले आहे ते कागदावर लिहून तपासा की आपण केलेल्या अभ्यासापैकी किती अभ्यास आपल्या लक्षात राहिलेला आहे.

वाचन आणि वाचलेले लिहिणे या दोन्हीचा वापर करून आपण वाचलेले जास्तीत जास्त लक्षात ठेवू सकता.

हे पण वाचा : अभ्यासात मन कसे लावावे?

अभ्यासाचे नियोजन कसे करावे ?

या मुद्द्याकडे अनेक विद्यार्थी एक तर कल्पना नसल्याने किंवा पुरेसी माहिती नसल्याने दुर्लक्ष करत असतात. अभ्यासाचे नियोजन हे अभ्यास करण्याइतकेच महत्वाचे आहे.

कारण नियोजनबध्द पद्धतीने केलेला अभ्यास हा नेहमी जास्त उपयुक्त ठरतो. म्हणूनच अभ्यासाचे नियोजन प्रत्येक विद्यार्थ्याने केले पाहिजे.

अभ्यासाचे नियोजन करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या तर उत्तम राहील.

कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा ते ठरवून घ्या. शक्यतो कठीण विषयासाठी थोडा जास्त वेळ काढा कारण कठीण सांगितल्यानंतर त्या विषयाचा अभ्यास करताना सुरुवातीची दहा मिनिटे तर आपल्याला जुळवून घेण्यामध्येच जाणार आहेत.

वेळ आणि विषय ठरवून झाल्यानंतर अभ्यासासाठी एक चांगली जागा निवडा. या ठिकाणी अभ्यास करत असताना घरातील टिव्ही किंवा इतर व्यक्तींचा आपल्याला अडसर येणार नाही याची काळजी घ्या.

अभ्यासाच्या वेळेमध्ये मोबाईल सारखी वस्तू आपल्या जवळ ठेवू नका तसेच सोबत पाणी आणि इतर आवश्यक वस्तू ठेवा जेणेकरून अभ्यास मध्येच सोडून आपल्याला उठून जावे लागणार नाही.

या सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या तर आपल्या अभ्यासाचे नियोजन अगदी सुरळीत होऊन अभ्यासही चांगला होईल.


अभ्यास किती वेळ करावा ?

आपण बघितले असेल काही विद्यार्थी तासनतास अभ्यास करत असतात तर काही विद्यार्थी फक्त ठराविक तास अभ्यास करून शुध्दा चांगले गुण मिळवत असतात.

त्यामुळे याठिकाणी आपण 4 तास किंवा 8 तास अभ्यास केला पाहिजे असे नाही सांगणार. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अभ्यास वेळ बघून करू नका तर अभ्यासासाठी ठराविक मुद्दा/धडा निवडा जो समजून घेण्यासाठी अभ्यास करा.

ठराविक मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला एका तासाचा वेळ जाणार असेल आणि आपण अर्ध्या तास अभ्यास करणार असल्याचे ठरविले तर तो मुद्दा आपल्या लक्षात येणार नाही आणि आपली तीस मिनिटे सुध्दा व्यर्थ जातील.

म्हणूनच अभ्यासाचे नियोजन करत असताना फक्त वेळेचा विचार करून नका की मला या दिवशी एवढे तास अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास समजून घेण्यासाठी किती वेळ लागेल त्यानुसार नियोजन करून अभ्यास करा.

एकंदरीत काय तर कुणी सांगत असेल एवढे तास अभ्यास केला पाहिजे तर त्याकडे लक्ष देऊ नका उलट आपले लक्ष अभ्यास समजून घेण्यावर लावा. मग तो अभ्यास एक तासाचा होवो की तिन तासाचा.

कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करावा ?

कमी वेळेत जास्त अभ्यास ही संकल्पनाच मला चुकीची वाटते कारण जर आपण हे करायला गेलो तर मात्र खिचडी झाल्याशिवाय राहणार नाही.

पण तरीही जर आपण पूर्ण वर्षभर अभ्यासामध्ये Procrastination (दिरंगाई किंवा चालढकल) केले असेल तर आपल्यासाठी काही बाबी लक्षात घेण्यासारख्या.

कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करावा ? या प्रश्नाविषयी विचार करणे सोडून द्या आणि आपले मन फक्त एका वगोष्वटीर केंद्रित करा आणि तो म्हणजे अभ्यास. 

पण याठिकाणी सुध्दा आपल्याला थोड्या नियोजनाची गरज भासेल. त्यासाठी पुढील गोष्टी करा.

ज्या विषयांचा अभ्यास करायचा आहे त्यांची प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करून घ्या आणि प्रत्येक विषयासाठी वेळ ठरवून घ्या.

आता ठरलेल्या वेळेत फक्त त्या विषयाशी संबंधित अभ्यास साहित्य तुमच्या जवळ ठेवा इतर विषयाचे अभ्यास साहित्य मिसळू नका.

आपल्याकडे असलेला मोबाईल किंवा इतर वस्तू बंद करून ठेवा (किंवा मित्रांकडे देऊन ठेवा) जेणेकरून त्यांचा अडसर निर्माण होणार नाही.

अभ्यासाला सुरुवात करताना पेन कागद जवळ बाळगा आणि महत्वाचे मुद्दे त्यावर लिहा. पुढे याच मुद्द्यांचा वापर करून आपल्याला रिविजन करता येईल.

अभ्यासासाठी काही टिप्स

  • अभ्यासाला बसण्यासाठी योग्य ठिकाण निवडा. बसण्यासाठी टेबल/खुर्चीचा वापर केल्यास उत्तम कारण पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. अभ्यासाच्या ठिकाणी पुरेसा उजेड असावा लिहित असताना हाताची सावली लिखाणावर येणार नाही याकडे लक्ष द्या. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसा जेणेकरून त्या ठिकाणी गेल्यावर आपोआपच अभ्यासाला बसण्याची सवय लागेल.
  • अभ्यासाला बसल्यानंतर मन न लागणे, मनात इतर विचार येणे किंवा झोप येणे या गोष्टी होने साहजिकच आहे पण तरीही अभ्यास न सोडता कमीत कमी दहा मिनिटे अभ्यास करत राहा.आपले मन हळूहळू आपोआपच अभ्यासामध्ये लागेल.
  • अभ्यासाला बसल्यावर कुठल्याही प्रकारचे चाळे करू नका आपले शरीर स्थिर ठेवा. केस खाजविणे, पेन्सिल चावणे, झोपून अभ्यास करणे इत्यादी गोष्टी करून नका यामुळे आपल्या मनाची एकाग्रता तुटू शकते.
  • अभ्यासाच्या ठिकाणी शांतता असेल तर खूप फायदेशीर ठरते. मनाला शांतता देणारे संगीत सुध्दा ऐकू शकता. तसे मनाची एकग्रता असेल तर आपण कितीही गोधळ असला तरीही अभ्यास करू सकतो.
  • अभ्यासाला बसण्याआधी आपल्या घरच्यांना सांगून ठेवा जेणेकरून अभ्यास चालू असताना ते आपल्याला काही सांगणार नाही.

अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे आपल्यालाही अभ्यास कसा करावा ? या प्रश्नाने याआधी हैराण केले असेल पण आता आपल्याला थोडी कल्पना आली असेल की आपल्याला चांगला अभ्यास कसा करता येईल.

हे पण वाचा : Nibandh Lekhan in Marathi

या पोस्टच्या माध्यमातून आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे समाधान झाले असेल असी आशा आहे पण तरीही अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करू सकता. आम्ही आपल्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचे प्रयत्न करू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या