Nibandh Lekhan in Marathi | निबंध लेखन कसे करावे ?

Nibandh Lekhan in Marathi

निबंध लेखन हा एक असा विषय आहे जो शाळा कॉलेज मध्ये तर येतोच परंतु हा विषय एवढा खोल आहे की अनेक व्यक्तींना निबंध लेखनाची आवड आहे म्हणून सुद्धा लिहत असतात.

आपल्याला शाळा-कॉलेजसाठी किंवा आवड/छंद जोपासावा म्हणून निबंध लिहायचा असेल किंवा सुरुवात करायची असेल आणि निबंध कसा लिहावा हे शोधत असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आलेले आहेत.

या पोस्टमध्ये आपण निबंध लेखन कसे करावे या विषयावर माहिती घेणार आहोत. हि पोस्ट लिहिण्यासाठी आम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीचा वापर करून आपल्यासाठी काही उपयुक्त टिप्स शोधल्या आहेत.

सध्याच्या युगात लेखन कलेला खूप महत्व आलेले आहे, त्यामुळे आपल्याकडे लेखन कला असणे आवश्यक असणार आहे. लेखन कलेचा वापर करून आपण आपले विचार, भावना इतरांपर्यंत पोहोचवू शकतो.

लेखन कला म्हणजेच चांगले लिहिणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने चांगले कसे लिहावे हे शिकून घेतले तर त्याला शिक्षणामध्येच नाही तर नंतरच्या जीवनामध्येही याचा लाभ नक्की मिळू शकतो.

निबंध लेखन म्हणजेच एखाद्या विषयावर चांगल्या पद्धतीने म्हणजेच सुसंगतपणे आणि आकर्षकपणे आपल्या विचारांची मांडणी करणे. कुणालाही आवडेल असे लिहिण्यासाठी आपले विचार खोल असावे लागतात आणि त्यासाठी आपल्याला वाचन आणि चिंतन महत्वाचे आहे.

एखाद्या विषयावर निबंध लिहत असताना मनामध्ये खूप काही सुचले तरी सुद्धा आपल्याला विषयाशी निवडीत आणि आवश्यक माहितीच लिहायची असते.

निबंध लेखन ही सुद्धा एक कला आहे आणि या कलेचा सराव करण्यासाठी आपल्याला पुढील सूत्राचा फायदा होऊ शकतो. 

Nibandh Lekhan in Marathi

निबंध लेखनाचे सूत्र

  1. वाचन
  2. श्रवण
  3. निरीक्षण
  4. मनन

वाचन, श्रवण, निरीक्षण आणि मनन या चारही गोष्टीचा मेळ जुळला कि लेखन खूप छान होत असते. या चारही बाबी एक एक करून थोडक्यात समजून घेऊया.

वाचन

वाचन केल्यामुळे आपल्या विचारांमध्ये आणि एकूणच विचार क्षमतेमध्ये वाढ होत असते. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपण सुरुवातीला लहान-लहान पुस्तके वाचू शकता नंतर जस-जसी आपली वाचनाची आवड वाढेल तसे आपण मोठी पुस्तके सुद्धा वाचू शकता.

श्रवण

चांगला निबंध लिहिण्यासाठी आपल्याला चांगला श्रोता होणे गरजेचं आहे. सध्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे त्यामुळे आपण चांगल्या व्यक्तींच्या मुलाखती किंवा भाषणे ऐकू शकता. त्यांच्या मुलाखती बघून चांगल्या प्रकारे समजण्याचा प्रयत्न करा.

निरीक्षण

निरीक्षण आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये उपयोगी पडत असते. आपल्या आजूबाजूच्या माणसांचे बोलणे, चालणे, पोशाख, स्वभाव इत्यादींचे निरीक्षण करा. शाळा-कॉलेजमधील सहलीमध्ये भाग घ्या आणि नवीन ठिकाणी जाऊन नवीन स्थळ, नवीन लोकांचे निरीक्षण करा. प्रत्येक व्यक्तीमधील वेगळेपण बघा. निसर्गाचे निरीक्षण करा.

मनन

आपण वाचन, श्रवण आणि निरीक्षण केल्यानंतर या गोष्टीवर मनन किंवा चिंतन आवश्यक असते. आपण काय वाचले, काय ऐकले, काय निरीक्षण केले हे आपल्याला किती समजले तसेच कधी पर्यंत आठवण राहील, ते आपल्याला लिहिता येईल का? हे आपल्याला समजत असते मनन केल्यामुळे म्हणून मनन खूप महत्वाचे आहे.

या चारही बाबींचा वापर करून ते आधी 25 ते 30 शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा, त्याचा सर्व करा आणि आपल्याला जमायला लागल्यावर शब्दांची संख्या वाढवा.

याच पद्धतीने आपण एखाद्या विषयावर चांगल्या प्रकारे निबंध  शकता.

निबंध आकर्षक होण्यासाठी चित्ताकर्षक सुरवात , चटकदार शेवट व मुद्देसूद मांडण आवश्यक आहे. निबंध लेखनास सुरुवात कशी करावी आणि शेवट कसा करावा हे आपल्याला हळू-हळू सरावाने येईलच.

निबंध लेखन करत असताना आपल्याकडून काही चुका होऊ शकतात किंबहुना निबंध लेखनात पुढील दोष काढले जातात.

निबंध लेखनातील दोष

  1. सुरुवात चांगली नसणे
  2. शुद्धलेखनाचा अभाव
  3. मुद्दे मागे-पुढे होणे
  4. एकाच मुद्द्यावर जास्त भर देणे
  5. शेवट अर्धवट वाटतो.

यासारखे दोष आपल्या लेखनामध्ये सापडत असतील तर ते दुरुस्त करून पुन्हा लिहा आणि पुन्हा असे होणार नाही याची काळजी घ्या.

निबंध लिहीत असताना चुका होऊ नयेत यासाठी आपल्याला काही बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. निबंध लेखनासाठी दररोज शुद्धलेखनाचा सराव करावा. निबंध लेखन करत असताना आपण खालीलप्रमाणे काळजी घेऊ शकता.

निबंधलेखन करताना कोणती काळजी घ्यावी ?

  1. लिहिताना समास सोडावा.
  2. शब्द चुकला तर खोडताना  त्या शब्दावर काट मारून तो शब्द पुढे लिहावा (शब्द गिरवू नये)
  3. प्रत्येक परिच्छेदापूर्वी मुद्द्याचे नाव लिहून अधोरेखित करावे.
  4. प्रस्तावना आकर्षक असावी.
  5. शब्द काळजीपूर्वक वापरावेत.
  6. पुनरावृत्ती टाळावी.
  7. आपल्याला कोणत्या प्रकारचा निबंध चांगला लिहिता येतो याचा विचार करावा व विषयाची अचूक निवड करावी.
  8. आकर्षक प्रारंभ, विचारपूर्वक मध्य व प्रेरक उद्बोधक शेवट करावा.
  9. विषयाला नुसरून पूरक पोषक मुद्दे मांडा.

वरील सर्व माहिती आपल्याला निबंध लेखन करण्यासाठी उपयोगी ठरेल याच हेतूने निबंध लेखन कसे करावे ही पोस्ट आपल्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न केला, आणि आपण ही पोस्ट वाचत असल्यामुळे आमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असे  वाटते.

तर आपण थांबूया इथेच आणि भेटूया एखाद्या नवीन मुद्द्यासह पण तोपर्यंत या सर्व माहितीचा वापर करून आपण लिहा एक छानदार निबंध आणि शेयर करा आपल्या मित्रमंडळीसोबत :)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या