अभ्यास करण्यासाठी मनाची तयारी कसी करावी ?

अभ्यास

अभ्यास एक असा शब्द ज्याची विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आठवण परीक्षा जवळ आल्यावर होते. पण सर्वच विद्यार्थी असे नसतात काही विद्यार्थी सुरुवातीपासूनच थोडा - थोडा अभ्यास चालू करतात.

तर काही अभ्यासाची टाळाटाळ करत असतात, कारण त्यांना वाटत असते परीक्षा अजून एवढी लांब आत्तापासूनच काय अभ्यास करायचा ?

पण आपण या दोन्हीपैकी नाही आहेत, आपल्याला अभ्यास करण्याची इच्छा आहे परंतु आपले मन अभ्यासात लागत नाही, म्हणूनच आपण योग्य ठिकाणी आलेले आहेत.

कारण या पोस्ट मध्ये अभ्यासात मन कसे लावावे यासाठी काही मुद्द्यांच्या आधारे माहिती घेणार आहोत, आणि ही माहिती आपल्याला "अभ्यासात मन कसे लावावे?" या प्रश्नाचे उत्तर मिळवून देणार आहे.

अभ्यास करण्यासाठी प्रेरणा

कोणतीही गोष्ट प्रभावीपणे करण्यासाठी आपल्याकडे प्रेरणा असणे गरजेचे आहे. जसे की सचिन तेंडुलकर मोठा क्रिकेटर होऊ सकला कारण त्याच्याकडे त्यासाठी प्रेरणा होती.

प्रेरणा कुठूनही घेता येऊ सकते. आपण आपल्याला काय व्हायचे आहे ते ठरवून त्यापासून प्रेरणा घेऊ सकता किंवा एखाद्या यशस्वी / आवडत्या व्यक्तीला बघून प्रेरणा मिळवता येऊ सकते.

प्रेरणेमुळे माणसाचे मन उत्साहित होते आणि त्यामुळेच त्याला कोणतीही गोष्ट अवघड वाटत नाही. एखाद्या व्यक्तीला अशक्य वाटणारी गोष्ट प्रेरणा मिळाल्यानंतर त्याच व्यक्तीला ती गोष्ट खूप सहज वाटायला लागते आणि ती गोष्ट किंवा कार्य तो व्यक्ती पूर्ण करू सकतो.

अभ्यासासाठी प्रेरणा मिळविण्यासाठी आपण ए पी जे अब्दुल कलाम, बाबासाहेब आंबेडकर इत्यादी व्यक्तींबद्दल वाचू सकता.

त्यांचे आत्मचरित्र वाचा त्यांनी किती कठीण परिस्थीतीचा सामना केला आणि ते एवढ्या मोठ्या स्थानापर्यंत कसे पोहोचले याबद्दल वाचून आपल्याला खूप प्रेरणा मिळेल.

अभ्यास करण्याचे कारण

जगात घडणाऱ्या अनेक घटनांमागे/गोष्टींमागे काही न काही कारण असते. कारण नसेल तर ती गोष्ट होने अवघड जाते.

म्हणूनच आपल्या अभ्यासाचे कारण ठरवून घ्या. अभ्यासाची कारणे अनेक आणि वेगवेगळी असू सकतात. जसे की, कुणाला सरकारी नोकरी मिळवायची आहे, तर कुणाला शाळा-कॉलेजची परीक्षा पास करायची आहे, तर कुणाला एखाद्या गोष्टीमध्ये प्राविण्य मिळवायचे आहे.

आणि असे अभ्यासाचे कारण स्पष्ट असेल तर अभ्यास करण्यात अडचण येणार नाही, म्हणूनच आपण सुध्दा अभ्यास करण्याआधी कारण ठरवून घ्या.

शक्य असल्यास ते कारण मोठ्या अक्षरात लिहून आपल्याला नेहमी दिसेल असा ठिकाणी लावा.

व्यायाम आणि ध्यानधारणा महत्वाची

आपले शरीर निरोगी असेल तर आपण कितीही आदळ-आपट करू सकतो. सांगण्याचा अर्थ असा की अभ्यासासाठी फक्त प्रेरणा आणि कारण मिळून होणार नाही.

तर त्यासाठी आपले शरीर तंदुरुस्त आणि मन स्थिर असणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आणि म्हणूनच आपल्याला याकडे लक्ष द्यावे लागेल.

शरीराला चांगले ठेवण्यासाठी आपल्याला दररोज कमीत-कमी अर्धा तास तरी व्यायाम आपण केला पाहिजे. अनेक वेळेस आपल्याला वेळ मिळत नाही असे सांगून आपला व्यायाम लांबवत असतो.

परंतु असे न करता जर सकाळी उठल्यानंतर लगेच अर्धा तास व्यायाम केला तर आपल्याला पूर्ण दिवसासाठी स्फूर्ती मिळून जाते.

तसेच मनाच्या बाबतीत सुध्दा आहे. आपल्या मनाचा प्रसन्न ठेवण्यासाठी सकाळ-संध्याकाळ दहा मिनिटे तरी ध्यान धारणा करण्याची सवय लावा. ध्यान लावल्यामुळे आपल्या मनामधील इतर त्रासदायक कचरा कमी होण्यास मदत होते.

वरील सांगितलेल्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करून अंमलबजावणी केली तर आपल्याला येणारी अडचण नक्की दूर होईल.

अभ्यास हा खूप महत्वाचा आहे तो आपल्याला शिक्षणासाठीच नाही तर इतर ठिकाणीसुध्दा करावा लागू सकतो :) आपल्याला ही पोस्ट कसी वाटली ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांसोबत सुध्दा शेयर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या