MPSC Full Form काय ? नोकरीसाठी उत्तम पर्याय आहे का ?

MPSC साठी अनेक विद्यार्थी तयारी करत असताना आपण बघितले असेल किंवा स्वत: तयारी करीत असाल / करणार असाल म्हणूनच ही पोस्ट वाचत आहात, तर या पोस्ट मध्ये आपण MPSC Full Form, MPSC कडून कोणत्या परीक्षा घेतल्या जातात त्यासाठी कोणती पात्रता लागते इत्यादी माहिती बघणार आहोत.

या परीक्षेबाबत अनेक आपण ऐकले किंवा वाचलेले आहेच तरी आपण या पोस्ट मध्ये MPSC बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटेल आणि आपण ती आपल्या मित्रांसोबत शेयर कराल अशी आशा बाळगतो.

तर जास्त वेळ वाया न घालवता काही प्रश्नांच्या माध्यामतून MPSC बद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

MPSC म्हणजे काय ?

MPSC हे राज्य सरकार कडून चालवली आणि सांभाळली जाणारी एक संस्था आहे. या संस्थेचं नाव "महाराष्ट्र लोकसेवा आयोग" आहे. या संस्थेकडून विविध पदांच्या भरती प्रक्रिया राबविल्या जातात. या संस्थेकडून शासकीय सेवेत येणाऱ्या तरुणांसाठी दरवर्षी भरती प्रक्रिया राबविण्यात येते.

संस्थेमार्फत उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक , तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी इत्यादी पदे भरली जातात.

MPSC Full Form

MPSC म्हणजे काय हे आपल्या लक्षात आले असेल, तर आता MPSC चा फुल फॉर्म काय आहे ते बघूया. वर आपण वाचले असेलच की या संस्थेला महाराष्ट्र लोकसेवा आयोग असे सांगितले जाते म्हणूनच जेव्हा आपण इंग्रजी मध्ये बघितले तर त्याला Maharashtra Public Service Commission असे सांगितले जाते. 

यावरून त्याला शोर्ट केल्यामुळे MPSC सांगण्यात येते आणि बोलताना MPSC पटकन बोलले जात असल्याने या शब्दाचा जास्त वापर केला जातो.

MPSC परीक्षेसाठी पात्रता कोणती ?

अनेक वेळी आपण मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून MPSC बद्दल ऐकले असेल की ठराविक मुलगा MPSC परीक्षेची तयारी करत आहे. आणि तुमच्या मनात कदाचित हा प्रश्न आला असेल की या परीक्षेच्या तयारीसाठी पात्रता काय असते?

ही पात्रता आपल्याला समजली तर आपणही परीक्षेसाठी तयारी करून परीक्षा देऊ सकता. म्हणूनच इथे पात्रता कोणती पाहिजे याविषयी माहिती घेऊ.

MPSC Full Form

MPSC परीक्षेसाठी पात्रता :

  • या परीक्षेस पात्र उम्मेदवार हा भारताचा नागरिक असायला हवा.
  • या परीक्षेसाठी किमान वय १९ वर्षे असायला हवे. तसेच खुल्या गटातील उमेदवारांचे जास्तीत जास्त वय हे ३८ वर्षे आणि राखीव गटातील उमेदवारांचे जास्तीत जास्त वय हे ४३ वर्षेपेक्षा जास्त नसावे.
  • परीक्षेस पात्र होण्याकरिता उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा मूळ निवासी असायला हवा व त्याच्याकडे महाराष्ट्राचे मूळ निवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे गरजेचे आहे.
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वरील पात्रता ही सर्वसाधारण पात्रता आहे, MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक परीक्षेची शैक्षणिक आणि वयासाठीची पात्रता वेगळी असू सकते.

वरील पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा देऊन शासकीय सेवेत रुजू होऊ सकता.

MPSC कडून कोणत्या परीक्षा घेतल्या जातात ?

MPSC कडून अनेक विभागासाठी परीक्षा घेतल्या जातात. त्या परीक्षा कोणत्या ते बघूया.

  • राज्य सेवा परीक्षा – Maharashtra State Service Examination
  • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ परीक्षा – Maharashtra Engineering Services Group A Examination
  • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-ब परीक्षा – Maharashtra Engineering Services Group B Examination
  • सहाय्यक अभियंता (विद्युत) श्रेणी-2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब – Assistant Engineer (Electrical) Gr-2, Maharashtra Electrical Engineer Service Gr-B
  • महाराष्ट्र वन सेवा परीक्षा – Maharashtra Forest Service Examination
  • राज्य कर निरीक्षक परीक्षा – State Tax Inspector Examination
  • कर सहाय्यक गट-क परीक्षा – Tax Assistant Examination
  • महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा – Maharashtra Agriculture Service Examination
  • पोलीस उपनिरीक्षक परीक्षा – Police Sub Inspector Examination
  • दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा – Civil Judge (Jr.Div), Judicial Magistrate (1st class) Competitive Exam
  • सहाय्यक परीक्षा – Assistant Examination
  • लिपिक टंकलेखक परीक्षा – Clerk Typist Examination
  • सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा – Assistant Motor Vehicle Inspector Exam

वरील सर्व परीक्षा ह्या MPSC कडून घेतल्या जात असून दरवर्षी त्यांसाठी भरती घेतली जाते आणि त्यामध्ये इच्छुक व पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

हे पण वाचा : MPSC PSI Book List

हे पण वाचा : MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा Book List

MPSC परीक्षेसाठी निवड प्रक्रिया कशी असते ?

MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या भरतीची निवड प्रक्रिया ही तिन टप्प्यात घेण्यात येत असते.

  • पूर्व परीक्षा
  • मुख्य परीक्षा
  • मुलाखत

या तिनही टप्प्यातून पुढे जाऊन आपल्याला शासकीय नोकरी मिळवता येते.

MPSC साठी अर्ज कसा करावा ?

आयोगाविषयी माहिती आपण घेतलेली आहे आता जर का आपल्याला परीक्षा द्यायची असेल तर ती कसी द्यायची ते बघूया.

परीक्षेला बसण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी MPSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले खाते (Profile) तयार करून घ्यावे लागेल.

वेबसाईटवर एकदा आपली पूर्ण प्रोफाईल तयार झाली की आपण MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज करू सकतो फक्त आपली पात्रता त्या भरतीसाठी आवश्यक पात्रते एवढी असणे आवश्यक आहे.

MPSC ची अधिकृत वेबसाईट : https://mpsconline.gov.in/

हे पण वाचा : ITI Full Form in Marathi

MPSC Full Form आणि त्यासोबतच याच्याशी संबंधित इतर माहिती आपण या पोस्ट मधून घेतलेली आहे, या पोस्टमध्ये दिलेली माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरेल असी आशा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या