ITI full form in marathi या प्रश्नाने उत्तर शोधण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहेत. या पोस्ट मध्ये आपल्याला ITI म्हणजे काय आणि त्याचाशी संबंधित इतर माहिती मिळणार आहे.
ही पूर्ण पोस्ट वाचल्यानंतर ITI म्हणजे काय ? ITI चा इंग्लिश Full Form काय ? ITI मध्ये कुणाला प्रवेश घेता येते ? इत्यादी ITI बद्दल असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत.
ITI Full Form in Marathi (ITI म्हणजे काय ?)
Industrial Training Institute हा ITI चा Full form होतो, यालाच मराठी मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे सांगितले जाते. याच्या अंतर्गत विविध अभ्यासक्रम राबविले जातात. जे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील उद्योगांमध्ये काम करण्यासाठी तयार करत असतात.
ITI कडून शिकविले जाणारे सर्व अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारित आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांकडे उत्तम दर्जाचे कौशल्य तयार होऊन ते नोकरीसाठी तयार होत असतात.
अनेक विद्यार्थी आपल्या करिअरची सुरुवात याच्या मदतीनेच करत असतात.
ITI अभ्यासक्रम कालावधी
ITI मध्ये अनेक अभ्यासक्रम शिकविले जातात ज्यांचा कालावधी कमीत कमी सहा महिने ते जास्तीत जास्त दोन वर्षांचा असतो.
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर Apprenticeship करणे आवश्यक असते, हे एक ते दोन वर्षांचे असू शकते. Apprenticeship पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांकडे प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आणि दाखला असतो.
ITI केल्यानंतर नोकरी
ITI चे प्रशिक्षण आणि त्यानंतर Apprenticeship केल्यानंतर विद्यार्थ्याकडे कौशल्य आणि अनुभव दोन्ही गोष्टी आलेल्या असतात. त्यामुळे त्याने निवडलेल्या क्षेत्रामध्ये कुठेही त्याला नोकरी उपलब्ध होऊ शकते.
ITI केल्यानंतर खाजगी तसेच शासकीय क्षेत्रामध्येही नोकरी उपलब्ध असतात. कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेतल्यामुळे त्यांना सामान्य नोकरवर्गापेक्षा जास्त पगार मिळू शकतो.
ITI मध्ये कोण प्रवेश घेऊ शकतो
इयत्ता दहावी किंवा बारावी पास असलेला कोणताही विद्यार्थी ITI मध्ये प्रवेश घेण्यास पात्र असतो. ITI चे प्रवेश हे सर्वसाधारणपणे जून/जुलै मध्ये सुरु होत असतात. प्रवेश घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खाली दिलेली आहेत. जर आपण प्रवेश घेणार असाल आणि खालीलपैकी एखादे कागदपत्र कमी असेल तर लगेच ते तयार करून घ्या. जेणेकरून प्रवेशासाठी अडचण येणार नाही.
ITI प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
- १०वी/१२वी ची मार्कशीट (10th/12th Marksheet)
- १०वी/१२वी चे बोर्ड प्रमाणपत्र (10th/12th Board Certificate)
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (TC)
- जात प्रमाणपत्र (Cast Certificate)
- डोमेसाइल प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- ओळख प्रमाणपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड)
ITI मध्ये कोणत्या शाखा (Trades) आहेत
ITI मध्ये 100 पेक्षा जास्त अभ्यासक्रम (Trades) उपलब्ध आहेत मात्र प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावर सर्व Trades शिकविले जात नाहीत. एका प्रशिक्षण केंद्रावर काही मोजकेच Trades शिकविले जात असतात.
ITI मध्ये असलेल्या trades पैकी सर्वात जास्त निवड होत असलेले काही trades खाली दिलेले आहेत.
- वायरमन
- फिटर
- वेल्डर
- प्लंबर
- इलेक्ट्रिशियन
- मोटार मॅकेनिकल
- COPA
या पोस्ट मधून आपण ITI full form in marathi, ITI अभ्यासक्रम कालावधी तसेच शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे आणि नोकरीची संधी इत्यादी माहिती घेतलेली आहे.
ही माहिती आपल्याला उपयुक्त ठरली असेल अशी आशा आहे.
0 टिप्पण्या