बारावी चा निकाल लागल्यानंतर आपण सर्व दहावीच्या निकालाची वाट बघत होतो. विद्यार्थ्यांसोबतच पालकांना असलेली ही प्रतिक्षा आता संपलेली आहे, कारण दहावीचा निकाल 2 जूनला दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे.
मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरून आपल्याला निकाल बघता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली.
असा बघा दहावीचा निकाल
खाली मंडळाच्या वेबसाईट लिंक देण्यात आलेल्या आहेत, त्यापैकी कोणत्याही वेबसाईटवर आपल्याला निकाल बघता येईल तसेच निकाल डाउनलोड किंवा प्रिंट करता येईल.
निकाल बघण्यासाठी लिंकवर क्लिक करून वेबसाईटला भेट द्या. मंडळाची वेबसाईट ओपन झाल्यावर आपल्याला येथे रोल नंबर आणि आईचे नाव टाकून निकाल बघता येईल.
दहावी परीक्षेचा निकाल बघण्यासाठी लिंक
https://ssc.mahresults.org.in/
हे पण बघा : ITI मध्ये कोण प्रवेश घेऊन शकतो व कोणकोणते कोर्सेस असतात?
0 टिप्पण्या