RRB Group D Bharti 2025 Information in Marathi
भारतीय रेल्वे भरती बोर्डाकडून देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर इत्यादी पदांच्या एकूण 32438 जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भरती संदर्भातील काही महत्वाची माहिती याठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे, तरी आपल्याला सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे .
पदसंख्या : 32438 जागा
पदाचे नाव : ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण किंवा ITI
वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
Fee :
- General/OBC/EWS : 500/-
- SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : 250/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 22 फेब्रुवारी 2025
RRB Group D Education Qualification 2025
उमेदवाराला या भरतीमध्ये पात्र होण्यासाठी इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/इन्स्टिट्यूट मधून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
RRB Group D Age Limit
कमीत कमी वय वर्षे 18 तर जास्तीत जास्त 36 वर्षे या वयोगातील उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत, तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवाराला 05 वर्षे सूट तर OBC प्रवर्गातील 03 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
RRB Group D Recruitment 2025 Documents Required
- सध्याच्या काळातील पासपोर्ट साइझ फोटो
- ओळख पत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड इत्यादी)
- इयत्ता 10 उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र
RRB Group D Salary
RRB Group D पदासाठी 7 व्या वेतन आयोगानुसार Salary देण्यात येते. त्यांना दरमहा रु. 18000/- एवढे बेसिक पे असून in-hand मिळणारी Salary ही रु. 22000/- ते रु. 25000/- एवढी असते.
RRB Group D Recruitment 2025 Selection Process
उमेदवाराला भरतीमध्ये निवडीसाठी विविध स्टेजेस मधून जावे लागेल. यामध्ये आधी CBT म्हणजे Computer Based Test घेण्यात येईल. नंतर शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी होते.
1. Computer Based Test (CBT)
कॉम्पुटर वर घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील. परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ देण्यात येईल.
2. Physical Efficiency Test (PET)
CBT उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना PET सठी बोलाविण्यात येईल. पुरुष वा महिला उमेदवारांसाठी वेगवेगळी शारीरिक चाचणी घेण्यात येते.
पुरुष उमेदवारांसाठी :
1 किलोमिटर एवढे अंतर 4 मिनिटे आणि 15 सेकांदामध्ये पूर्ण करणे.
2 मिनिटांच्या आत 35 किलो वजन 100 मीटर अंतरावर घेऊन जाणे.
महिला उमेदवारांसाठी :
1 किलोमिटर एवढे अंतर 5 मिनिटे आणि 40 सेकांदामध्ये पूर्ण करणे.
2 मिनिटांच्या आत 20 किलो वजन 100 मीटर अंतरावर घेऊन जाणे.
3. Document Verification
जे उमेदवार PET यशस्वीरीत्या पूर्ण करतील अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल.
4. Medical Examination
अंतिम नेमणूक होण्याआधी उमेदवाराची फिटनेस साठी वैद्यकीय तपासणी केली जाते.
0 टिप्पण्या