Maha TET Exam 2024 in Marathi (जाहिरात प्रसिद्ध)

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 

Maha TET Exam च्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने संपवलेली आहे. कारण परिषदेकडून महा टीईटी 2024 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

कोणत्याही शाळेमध्ये 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी साठी शिक्षण सेवक / शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे .ही शिक्षक पात्रता परीक्षा  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येत असते. 

Maha TET Exam 2024 साठी देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ही परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसंबंधी शासननिर्णय, सूचना आणि इतर माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत.

Maha TET Exam 2024 in Marathi

Maha TET साठी अर्ज कसा करावा?

Maha TET साठी पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा https://mahatet.in या अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असल्याने ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही.

Maha TET साठी अर्ज करण्यासाठी स्टेप खाली दिल्या आहेत.

  1. परीक्षाअर्ज करण्यासाठी  दिलेल्या लिंकवरून वेबसाईटला भेट द्या.
  2. नंतर होम पेजवरील लॉगिन या पर्यायामधील उमेदवाराची नवीन नोंदणी या पर्यायाचा वापर करून आपली नोंदणी करून घ्या.
  3. नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून आपल्याला हव्या असलेल्या पेपर साठी अर्ज भरता येईल . अर्ज व्यवस्थित भरून झाल्यांनतर सबमिट करा.
  4. अर्ज / फॉर्म सबमिट झाल्यांनतर आपल्याला परीक्षा शुल्क भरावे लागेल , त्यासाठी आपण डेबिट कार्ड ,  इंटरनेट बँकिंग किंवा इतर पर्यायांचा वापर करू शकता.
  5. परीक्षा शुल्क भरल्यानंतर आपला अर्ज यशस्वीरीत्या पूर्ण झाला असेल, शुल्क भरून झाल्यावर आपल्याला आपल्या अर्जाची प्रिंट घेता येईल.

Maha TET 2024 Application Form Last Date

महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार Maha TET 2024  साठी Application Form 9 सप्टेंबर 2024 पासून भरता येणार आहेत तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 सप्टेंबर 2024 असणार आहे .

Maha TET Exam 2024 परीक्षा शुल्क

पेपर 1  किंवा पेपर 2 साठी अर्ज करणाऱ्या SC/ST/अपंग उमेदवारांसाठी रु . 700/- तर इतर उमेदवार (VJA/DTA, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC, EWS, Open) साठी परीक्षा शुल्क रु. 1000/- इतके असेल.

तसेच दोन्ही पेपर (पेपर 1 व पेपर 2) साठी अर्ज करणाऱ्या SC/ST/अपंग उमेदवारांसाठी रु. 900/- तर इतर उमेदवार (VJA/DTA, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC, EWS, Open) साठी परीक्षा शुल्क रु. 1200/- इतके असेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक

https://mahatet.in

जाहिरात बघण्यासाठी लिंक

https://mahatet.in/Notices/Advertisement/ShowAdvertisement

परीक्षेबद्दल परिषदेकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचना

  • परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मुल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासननिर्णय परिषदेच्या वेबसाईट https://mahatet.in वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सुचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा.
  • अर्ज भरताना परीक्षार्थीनी इ.10 वी, इ.12 वी शैक्षणिकाव्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादि बाबतची माहिती मुळ प्रमाणपत्रावरुनच भरावी, स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणा पत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाची असल्याने सोबत ठेवावी.
  • सदर परीक्षेत प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क Email, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो, त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करुन ठेवावा. पेपर । (प्राथमिक स्तर) व पेपर II (उच्च प्राथमिक स्तर) दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी (प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर) असा विकल्प निवडावा, जेणेकरुन परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल, प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.
  • या जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ Online अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईम, बैंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही.) परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरुपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही, तसेच, आवेदनपत्र/कागदपत्रे (प्रमाणपत्रे) गटशिक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.
  • मुळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल, परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल, प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मुळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
  • एका पेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही.
  • सन 2018 व 2019 च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही? याबाबत खात्री करुन वस्तूनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी. आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहिल. तसेच या 2018 व 2019 यादी मध्ये समाविष्ठ असुन सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ठ झाल्यास कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.
  • सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या