YCMOU मध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रकिया सुरु झालेली आहे. B.A, B.Com, BCA, B.Sc सोबतच इतर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. विद्यापीठाची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असून विद्यार्थ्यांना प्रवेश फी सुद्धा ऑनलाईन भरण्याची सुविधा मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये Degree कोर्सेस सोबतच मान्यताप्राप्त PG कोर्सेस आणि डिप्लोमा कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत. YCMOU Courses List मध्ये आपण काही कोर्सेस बघू शकता.
YCMOU Admission 2024-25 Prospectus
प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती प्रॉस्पेक्टस मध्ये विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रवेश अर्ज भरण्यासाठी आपण एकदा प्रॉस्पेक्टस नक्कीच वाचणे आवश्यक आहे. खाली देण्यात आलेल्या लिंकवरून प्रॉस्पेक्टस डाऊनलोड करता येईल.
YCMOU Admission 2024-25 Fee
प्रवेश फी हि प्रत्येक अभ्यासक्रमानुसार वेगळी असणार आहे, B.A, B.Com च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 3288/- एवढी फी असेल तर द्वितीय वर्षासाठी 3958/- आणि तृतीय वर्षासाठी 4438/- इतकी असणार आहे.
इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश शुल्कासाठी माहिती पुस्तिका (Prospectus) बघा त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
YCMOU Admission 2024-25 Last Date
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला १ जून २०२४ पासून सुरुवात झालेली असून कोणत्याही विलंब शुल्काशिवाय विद्यार्थ्यांना ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची दिनांक ३१ जुलै असल्याने विद्यार्थांनी आपला प्रवेश अर्ज या तारखे आधीच भरून घ्यावा.
YCMOU Admission 2024-25 Official Link
संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट वरूनच घ्यावे लागणार आहे. विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट https://ycmou.digitaluniversity.ac/ ही आहे.
थेट विद्यापीठाच्या एडमीशन पेजवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
0 टिप्पण्या