Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayyak Bharti 2024

महावितरण मार्फत देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार विद्युत सहाय्यक या पदासाठी एकूण 5347 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक व पपात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून त्यासाठी 20 मार्च 2024 ही शेवटची दिनांक असणार आहे.

भरतीचे नाव : महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024

एकूण पदे : 5347 जागा

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

रिक्त जागांचा तपशील

विद्युत सहाय्यकांच्या एकूण जागांची प्रवर्गनिहाय विभागणी आपल्याला खालील तक्त्यामध्ये बघता येईल.

अ.क्र. पद प्रवर्ग पदसंख्या
1 विद्युत सहाय्यक अनुसूचित जाती 673
अनुसूचित जमाती 491
विमुक्त जाती (अ) 150
भटक्या जाती (ब) 145
भटक्या जाती (क) 196
भटक्या जाती (ड) 108
विशेष मागास प्रवर्ग 108
इतर मागास प्रवर्ग 895
ईडब्ल्यूएस 500
अराखीव 2081
एकूण 5347

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 पात्रता

शैक्षणिक पात्रता

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
            आणि
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (ईलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 वयोमर्यादा

  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 27 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस.) उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील.
  • दिव्यांग उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
  • माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षाची राहील.
  • महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचा-यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही.
  • तदर्थ मंडल/तथा म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण/महानिर्मिती/महापारेषण कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षण कालावधी एवढी कमाल वयोमर्यादा शिथिलक्षम राहील.
  • खेळाडूंसाठी सेवाप्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत 05 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहील.
  • महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र. सनिव-2023/प्र.क्र.14/कार्या-12, दिनांक 03 मार्च, 2023 अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादेत 02 वर्षे इतको शिथिलता देण्यात येत आहे.
  • "अनाथ" आरक्षणाकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमर्यादा 05 वर्षे शिथिलक्षम राहील.
  • एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलतीकरीता पात्र ठरत असल्यास पात्र सवलतीपैकी अधिकत्तम वयाची सवलत अनुज्ञेय राहील.
  • परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर, मागासवर्गीय उमेदवारांसाठी विहित केलेली वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक अटी/ निकषांसंदर्भात कोणतीही सूट/सवलत घेतली असल्यास अशा उमेदवाराचा अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावर विचार करण्यात येणार नाही.
  • वयोमर्यादेकरीता एस.एस.सी. प्रमाणपत्रावर दर्शविलेली / नोंदविलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल.

Fee : खुला प्रवर्ग : 250+ GST, राखीव प्रवर्ग : 125+ GST

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Syllabus

विद्युत सहाय्यक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या भरतीसाठी खालील प्रकारचा अभ्यासक्रम असेल, परीक्षेतील सर्व प्रश्न याच अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.

परीक्षेमध्ये Negative Marking असल्याने प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरांसाठी 1 गुण कमी करण्यात येईल, तर उत्तर न दिल्यास गुण कमी केले जाणार नाहीत.

अ.क्र. विषय प्रश्न गुण कालावधी
1 वीजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान (Professional Knowledge) 50 110 120 मिनिटे
2 तर्कशक्ती (Reasoning) 40 20
3 संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) 20 10
4 मराठी 20 10
एकूण 130 150

Mahavitaran Vidyut Sahayak Salary

या भरतीमधून नियुक्त करण्यात येणाऱ्या सहाय्यकांना एकत्रित मानधन दिले जाईल. नोकरीला लागल्यापासून तिन वर्षांपर्यंत उमेदवारांना मानधन तत्त्वावरच काम करावे लागते, यानंतर त्यांना Permanent करून घेतले जाते.

उमेदवारांना मिळणारे मानधन हे दरवर्षी वाढत असते. विद्युत सहाय्यक पदासाठी तिन वर्षांपर्यंत खालीलप्रमाणे मानधन मिळते.

प्रथम वर्ष - एकत्रित मानधन रुपये 15000/- दरमहा

द्वितीय वर्ष - एकत्रित मानधन रुपये 16000/- दरमहा

तृतीय वर्ष - एकत्रित मानधन रुपये 17000/- दरमहा

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Last Date

विद्युत सहाय्यक पदासाठी महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात : 01 मार्च 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 20 मार्च 2024

जाहिरात बघा

Apply Online

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या