तलाठी भरती परीक्षा निकाल 2023
तलाठी भरती परीक्षेचा निकाल जानेवारी 2023 पर्यंत लागण्याची शक्यता आहे आणि त्यासंदर्भात थोडक्यात माहिती या पोस्ट मध्ये देत आहे.
महाराष्ट्र महसूल विभागातर्फे तलाठी पदासाठी रिक्त असलेल्या 4793 जागांसाठी मोठी भरती घेण्यात आली. या भरतीसाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर 2023 या महिन्यात 57 शिफ्ट मध्ये आठ लाख पेक्षा जास्त उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली.
सर्व उमेदवारांच्या परीक्षा पार पडल्यानंतर विभागाकडून उमेदवारांकडून आक्षेप असल्यास नोंदवून घेतले. यामध्ये 16 हजार उमेदवारांनी आक्षेप नोंदविलेले आहेत.
परीक्षा संपून जवळपास तीन महिने होत आले आहेत आणि अजूनही उमेदवार निकालाची वाट बघत आहेत. उमेदवारांची ही प्रतिक्षा आता संपलेली आहे, कारण निकालासंदर्भात विभागाकडून उमेदवारांसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे.
उमेदवारांची संख्या जास्त असून त्यात कुठल्याही उमेदवारावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे आणि नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करण्याचे काम चालू आहे, म्हणूनच निकाल देण्यासाठी विभागाला विलंब होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
0 टिप्पण्या