कृषी सेवक पगार किती असतो ? नविन पगार वाढ झाली का ?

कृषी सेवक पदासाठी 2023 मध्ये घेतल्या जाणाऱ्या भरतीच्या जाहिरातीनुसार कृषी सेवक पदासाठी रु.16,000 एवढा पगार दिला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागामधील कृषी सेवकांच्या पगाराबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. येथे देण्यात आलेली माहिती ही अधिकृत शासन निर्णयानुसार देण्यात आलेली असल्यामुळे ती खात्रीशीर असणार आहे.

1 ऑगस्ट 2023 रोजी प्रशिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कृषी सेवक पदाच्या पगारामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. झालेली पगारवाढ 1 ऑगस्ट 2023 पासूनच लागू होणार आहे.

राज्यातील कृषी सहाय्यक संघटना आणि कृषी सेवकांच्या पगार वाढीच्या मागणीनंतर हा पगार वाढीचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Krushi Sevak Pagar

कृषी सेवक पदासाठी सातवे वेतन आयोग लागू होईल का ?

या पदासाठी सातवे वेतन आयोग लागू झालेले आहे. कृषी सहाय्यक संघटना आणि कृषी सेवकांनी सातव्या वेतन आयोगानुसारच पगारवाढीची मागणी केली होती, आणि आता झालेल्या पगारवाढीनंतर कृषी सेवक पदासाठी सुध्दा सातवे वेतन आयोग लागू झालेले आहे.

कृषी सेवकांच्या पगारामध्ये किती वाढ झाली ?

यावेळी झालेली पगारवाढ ही कृषी सेवक पदासाठी झालेली सर्वात मोठी पगारवाढ आहे. ही पगारवाढ लागू होण्याआधी कृषी सेवकांना दरमहा रु.6,000 एवढा पगार देण्यात येत होता. आता यामध्ये रु.10,000 एवढी वाढ करण्यात आल्याने एकूण पगार हा दरमहा रु.16,000 एवढा झालेला आहे.

मिळणारे इतर भत्ते कोणते ?

इतर शासकीय पदासाठी काही भत्ते मिळत असतात हे आपल्याला माहिती आहे, परंतु येथे थोडी वेगळी परिस्थिती आहे.

कृषी सेवक पदासाठी इतर भत्ते दिले जात नाही, कारण त्यांना वेतन देण्यात येते जे एकत्रित स्वरुपात दिले जाणारे मानधन असते.

पुढील पगारवाढ कधी ?

कृषी सेवक पदासाठी 2012 मध्ये दुसरी पगारवाढ झाली होती त्यानुसार त्यांना सहा हजार रुपये पगार देण्यात येत होता. त्यानंतर झालेली पगारवाढ ही तब्बल 11 वर्षानंतर म्हणजेच 2023 मध्ये झाली.

या दोन्हीमधील अंतर आणि इतर गोष्टी बघता पुढील पगारवाढ कधी होईल हे सांगणे अवघड आहे.

Conclusion

या पोस्ट मधून आपल्याला कृषी सेवक पगार किती असतो आणि ही पगारवाढ कधी लागू होईल इत्यादी माहिती मिळाली असेल तसेच ही माहिती उपयुक्त वाटली असेल असी आशा करतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या