Anxiety Meaning in Marathi आणि तणाव कमी करण्यासाठी उपाय

Anxiety meaning in marathi

परीक्षा जवळ आली किंवा परीक्षेला बसण्याआधी अस्वस्थ वाटणे, हातपाय थरथरायला लागणे, घाम येणे इत्यादी गोष्टींचा आपण या आधी अनुभव घेतलेला असेलच. याच परिस्थितीला Anxiety असे सांगितले जाते.

वरील सांगितलेला अनुभव हा कोणताही आजार नसून जेव्हा आपला मेंदू एखाद्या गोष्टीला खूप जास्त महत्व देतो तेव्हा आपले शरीर त्याप्रमाणे आपल्याला तयार करत असते. म्हणूनच आपल्याला असी लक्षणे दिसतात.

हा सुरुवातीला जरी आजार नसला तरी वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू सकते.

सध्या अनेक विद्यार्थी मित्रांना याचा त्रास होत असल्याचे आपण बघितले असेल म्हणूनच या पोस्ट मध्ये आपण Anxiety बद्दल माहिती घेणार आहोत.

Anxiety म्हणजे काय ?

सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाल्यास Anxiety म्हणजे चिंता. पण ही चिंता थोडीसी रोगाच्या जवळ असणारी चिंता आहे असे आपण समजून चालू सकतो.

कारण आपल्या या चिंतेसाठी वेळीच उपाय केले नाही तर आपल्याला मोठ्या अडचणींना सुद्धा सामोरे जावे लागू सकते. लहान-लहान चिंता जर आपण सतत करत राहिलो तर आपल्याला चिंता आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Anxiety चे प्रकार

कोणतीही लहान किंवा मोठी चिंता असेल ती कोणत्या प्रकारची आहे हे आपण समजून घेतले नाही तर आपल्याला त्यावरील उपाय शोधायला जास्त वेळ लागू सकतो. चिंतेचे काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

चिंतेचे 4 प्रकार

1) Social Anxiety Disorder

2) Panic Attack

3) Obsessive-Compulsive Disorder

4) Post-Traumatic Disorder

वरील चारही प्रकारच्या चिंतेमध्ये काही लक्षणे आपल्याला दिसून येत असतात ती पुढीलप्रमाणे आहेत.

  • सतत अस्वस्थता वाटणे
  • लक्ष केंद्रित न करता येणे
  • स्नायू मध्ये ताण येणे
  • थकल्यासारखे वाटणे
  • चिडचिड होणे
  • झोप न लागणे
  • हृदयाची धडधड वाढणे
  • घाम फुटणे

वरील चारही प्रकार खोलवर समजून न घेता आपण याठिकाणी दोन वेगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू.

1) नियमित चिंता (Normar Anxiety)

या प्रकारची चिंता बहुतेक सर्वच व्यक्तींमध्ये असते. नियमित चिंता जास्त धोकादायक नसली तरी सुध्दा आपल्या कार्यक्षमतेमध्ये अडथडा मात्र नक्कीच निर्माण करू सकते. या प्रकारच्या चिंतेवरही आपण ठराविक उपाय करून मात करू सकतो.

2) चिंता आजार (Anxiety Disorder)

कधी-कधी चिंता करणे सामान्य आहे पण जर आपल्याला जास्त चिंता करण्याची सवय झाली असेल किंवा आपण सतत चिंतेत राहत असाल तर हा चिंता आजार असू सकतो.

विनाकारण सतत चिंता करत राहणे, मित्र-मैत्रिणींसोबत असून सुध्दा वेगळ्याच कल्पनेत असणे, गरजेपेक्षा जास्त साफसफाई करणे, कोणतेही काम करत असताना अतिसावधपणा बाळगणे, कोणतीही वस्तू जागच्या जागी ठेवणे आणि नसल्यास सारखे सारखे चिडून सेट करत राहणे इत्यादी लक्षणे चिंता आजाराची असू सकतात.

चिंता आजाराची लक्षणे जाणवत असल्यास आपल्याला डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. आपल्याला डॉक्टर ठराविक औषध देतील असे नाही तर ते आपल्याला चिंतेमधून बाहेर पडण्यास मदत करतील.

शिवाय आपण खाली दिलेल्या उपायांचा वापर करून सुध्दा चिंता/तणाव कमी करू सकता.

तणाव कमी करण्यासाठी उपाय

चिंतेची लक्षणे दिसत असल्यास याठिकाणी सांगितलेल्या गोष्टी केल्यास कदाचित आपल्याला डॉक्टरांची मदत घ्यावी लागणार नाही.

1) शांत राहा

शांत राहून अनेक गोष्टी साध्य केल्या जाऊ सकतात म्हणूनच आपण शांत राहायला शिका. आपल्यासमोर कितीही मोठी अडचण देऊ द्या जर आपण शांत राहून विचार केला तर आपल्याला त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग लवकर मिळेल.

हेच आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा आपल्याला शाळा /कॉलेज मध्ये एक प्रोजेक्ट दिलेला असून त्यासाठी खूपच कमी वेळ देण्यात आलेला आहे. असा वेळी आपण "एवढ्या कमी वेळेत कसे पूर्ण होईल ?" याची चिंता करत राहिले तर आपल्याला मिळालेला वेळ अजूनही कमी होईल.

पण त्याऐवजी शांत राहून प्रोजेक्टला सुरुवात केल्यास वेळ संपेपर्यंत एक तर आपला प्रोजेक्ट पूर्ण झालेला असेल किंवा संपण्याच्या जवळ तरी आला असेल. म्हणूनच नेहमी शांत राहायला शिकणे आवश्यक आहे.

2) नकारात्मक विचारांना दूर ठेवा

नकारात्मक विचार आपली चिंता दूर करत नाही तर त्यामध्ये अजूनही भर पाडत असतात. नकारात्मक विचार आपल्या मनात आल्यास आपण कोणत्याही गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीनेच बघायला लागतो.

बरेच विद्यार्थी अभ्यास झालेला असेल किंवा थोडा बाकी असेल असा वेळी परीक्षेचा पेपर हातात येण्याआधीच हा विचार करायला लागतात की, पेपर नीट लिहिता नाही आला तर? काय होईल? मी नापास तर नाही ना होणार?

आणि मग एकामागून एक चिंता आपल्या डोक्यावर चढून बसतात, म्हणूनच आपण लहान लहान गोष्टींवरून नकारात्मक विचार करणे टाळावे.

3) नियमित व्यायाम

नियमित व्यायाम केल्यास आपले शरीर तर तंदुरुस्त राहतेच शिवाय आपले मनही प्रसन्न राहते, आणि प्रसन्न मन कधीही चिंतेत हरवत नाही. व्यायाम आपल्याला चिंतेपासून दूर ठेवण्यास मदत करते.

4) वर्तमानात जगा

अनेक विद्यार्थी खूप लांबचा म्हणजेच भविष्याचा अतिविचार करत असतात आणि यामुळेच चिंतेत राहत असतात.

भविष्याचा आपण विचार करायला नको असे माझे म्हणणे मुळीच नाही, आपण आपल्या भविष्यासाठी आखणी/प्लानिंग नक्की केली पाहिजे.

पण प्लानिंग केल्यानंतर त्यासाठी वर्तमानात म्हणजे दररोज त्यासाठी थोडे थोडे काम करा. जर आपण प्लानिंग करून फक्त असे असेल, असे झाले पाहिजे किंवा याउलट मी असे केल्याने माझे भविष्य चांगले होणार नाही इत्यादी ची चिंता करत बसल्यास आपण तणावात येऊ सकतो. म्हणूनच वर्तमान जगण्याची सवय लावा.

या पोस्ट मध्ये सांगितलेल्या गोष्टी नक्कीच आपली चिंता कमी करण्यास मदत करतील. फक्त ही पोस्ट वाचून काही होणार नाही तर आपल्याला प्रत्यक्ष त्या गोष्टी अमलात आणाव्या लागतील तरच आपण चिंतामुक्त होऊ सकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या