प्रत्येक YCMOU विद्यार्थ्याने ही Books नक्की वाचायला पाहिजेत

Books for Ycmou Students

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (YCMOU) मध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी हे एखादी नोकरी किंवा काम करत आपले शिक्षण पूर्ण करत असतात. जर का नोकरी करत नसेल तरी तो नियमित कॉलेज आणि YCMOU असा दोन गोष्टी नक्की सांभाळत असतो.

आपणही याप्रमाणेच मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणासोबतच इतर काही गोष्टी सांभाळत असाल, आणि म्हणूनच शिक्षण आणि इतर सर्व गोष्टी सांभाळताना कश्या अडचणी येतात याचा आपल्याला अनुभव आला असेलच.

यासाठीच या पोस्ट मध्ये काही Books सुचवणार आहे ज्या प्रत्येक YCMOU मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यालाच नाही तर प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टी सांभाळताना मदत करू सकतील.

या पुस्तकांमध्ये पैसाचा वापर कसा करावा, आपल्याला अडचणी आल्या तर त्यासाठी मन कसे तयार करावे आणि वेळेचे नियोजनावर आधारित Books चा समावेश असणार आहे. त्यामुळे ही पुस्तके वाचून त्याचा आपल्याला नक्की फायदा मिळणार आहे याची खात्री आहे.

हे पण वाचा : अभ्यास कसा करावा ?

वेळेचे नियोजन कसे करावे?

सर्वात आधी आपण नोकरी किंवा इतर कामासोबत आपल्या अभ्यासाचा ताळमेळ कसा बसवायचा यासाठी वेळेच्या नियोजनावर आधारित "टाईम मॅनेजमेंट" ही डॉ. सुधीर दिक्षीत यांच्याकडून लिहिलेली पुस्तक आपल्याला वेळेचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळे 30 सिद्धांताची ओळख करून देते.

डॉ. दिक्षीत यांची ही पुस्तक फक्त 128 पानांची असली तरी त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टींवर अंमलबजावणी केली तर आपल्याला त्याचा भरपूर फायदा होऊ सकतो. ही पूर्ण पुस्तक वाचायला आपल्याला 2 ते 3 तास पुरेसे आहेत. एवढ्या वेळात आपण ही पूर्ण पुस्तक वाचून संपवू सकता.

ही Book फक्त YCMOU च्या विद्यार्थ्यांनीच नाही तर इतर व्यक्तींनी सुद्धा नक्की वाचायला हवी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्यांनी तर नक्कीच वाचायला हवी.

हे तर झाले वेळेच्या नियोजनाबाबत पण आपल्याला पैसा आणि त्याचे नियोजन सुध्दा जमायला पाहिजे नाही तर आपल्या आयुष्यात पैसाच्या अडचणी नक्कीच राहणार आहेत.


पैसाचे नियोजन कसे करावे?

अनेक वेळेस आपण विशेषतः विद्यार्थी असताना पैसा खर्च करताना जास्त विचार करत नाही. मित्रांसोबत छोटीसी पार्टी असो किंवा एखाद्या ट्रीपला जायचे असो आपण लगेच तयार होतो. परंतु हे तेच वय आहे ज्या वयात आपल्याला पैसाचे नियोजन शिकण्याचा वेळ असतो आणि या वयात शिकले नाही तर कॉलेज संपूर्ण नोकरी लागल्यावर पैसाचे नियोजन करताना आपला जीव गुदमरल्यासारखा होतो.

म्हणूनच रॉबर्ट कियोसाकी यांची "रिच डॅड पुअर डॅड" ही पुस्तक नक्की वाचायला पाहिजे. या पुस्तकामध्ये श्रीमंत व्यक्ती पैसाचा वापर कसा करतो आणि एक साधारण व्यक्ती पैसाचा वापर कसा करतो याबद्दल माहिती दिलेली आहे.

ही पुस्तक आपल्याला पैसा कसा पद्धतीने खर्च करावा तसेच पैसाचा वापर पैसा बनवण्यासाठी कसा करावा इत्यादी गोष्टी समजण्यास मदत करते. त्यामुळे या पुस्तकातील काही अनुभव तरी आपण समजून घेऊन त्यावर अंमलबजावणी केलेली जेव्हाही उत्तम राहील.

मनावर ताबा कसा मिळवाल?

आता गोष्ट करूया या पोस्ट मधील शेवटच्या पुस्तकाची, ही पुस्तक आहे "द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड". जोसेफ मर्फी यांच्या ह्या पुस्तकामधून आपल्या मनाविषयी अनेक गोष्टी समजायला मिळतात.

आपण ज्या काही कृती करतो किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत कसे वागतो याचा सरळ संबंध आपल्या अवचेतन मनाशी असतो. त्यामुळे आपण आपल्या या अवचेतन मनाची शक्ती ओळखून घेतली पाहिजे आणि हे करण्यासाठी मर्फी यांची ही पुस्तक आपल्याला मदत करेल.

Conclusion

वरील सर्व Books फक्त YCMOU च्या विद्यार्थ्यांनाच नाही तर किंवा शिक्षण घेत असतानाच नाही तर पुढील आयुष्यात सुद्धा मदतगार ठरू शकतात. ही पुस्तके वाचून त्यामधील गोष्टी आपल्या जीवनात/लाईफमध्ये उतरवून बघा नक्की त्याचा प्रभाव जाणवेल.

आम्हाला ही पुस्तके खूप चांगली वाटली म्हणून आपल्यासोबत शेयर केली तुम्ही पण ही पुस्तके वाचा आणि कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की कळवा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या