आतापर्यंत मराठी भाषेमध्ये एवढी पुस्तके लिहिली गेली आहेत कि याठिकाणी त्याची गणना करणेही चुकीचे राहील. चुकीचे राहील सांगण्यापेक्षा गणना करणे अवघड राहील असेच सांगावे लागेल.
मराठी भाषेतील पुस्तके ही मराठी वाचकांसाठी जणू काही मित्र-मैत्रिणी सारखीच आहेत. कारण पुस्तके ही वाचकांसोबत प्रत्यक्ष आपला अनिभव शेयर करत असतात. म्हणूनच सांगण्यात आलेलं आहे की, पुस्तके माणसाला कधीही एकटी पडू देत नाहीत.
तसं पाहता आपण आता पर्यंत अनेक पुस्तके वाचली असतील. नविन वाचली असतील, जुनी वाचली असतील, विकत घेऊन किंवा मित्राकडून घेऊन किंवा ग्रंथालयात जाऊन वाचली असतील.
आपल्यासाठी मराठी भाषेमधील काही दुर्मिळ पुस्तके
मात्र काही पुस्तके अशी सुद्धा आहेत जी खूपच जुनी आहेत फक्त जुनी नाही तर ती दुर्मिळ सुद्धा आहेत. या पोस्ट मध्ये आपल्यासोबत काही अशीच काही पुस्तके शेयर करणार आहे.
या पोस्ट मध्ये शेयर केलेली पुस्तके व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यामुळे आपण व्यावसायिक आणि वाचक दोन्ही असाल तर जास्त फायदा मिळणार आहे.
कारण ही पुस्तके जरी जुनी असली तरी काही अडचणी कश्या सोडवायच्या याचे थोडक्यात आपल्याला ज्ञान होणार आहे.
जी खरोखर मराठीमधील दुर्मिळ पुस्तके आहेत, ही पुस्तके कदाचितच आपल्याला एखाद्या वाचनालयात मिळतील. पुस्तकांच्या दुकानात मिळणे तर अवघडच आहे.
हे पण बघा : डॉ. कलाम यांची काही उत्तम पुस्तके
दुर्मिळ मराठी पुस्तके तेही PDF स्वरूपात
मराठी भाषेमधील हि पुस्तके हार्ड कव्हर मध्ये म्हणजेच प्रिंटेड स्वरूपात मिळणे अवघड असल्याकारणाने याठिकाणी ती पुस्तके आपल्याला PDF स्वरूपात डाउनलोड करता येणार आहेत .
सर्वात आधी "सुती वस्रोद्योग" ही कै. नरसिंह गोपाळ देवधर यांच्या पुस्तकाविषयी थोडक्यात बोलूया. या पुस्तकामध्ये वस्रोद्योगाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये मुख्यत्वे वस्रोद्योग कसा बदलत गेला, तो कसा चालतो त्यामध्ये कोणत्या अडचणी त्यावेळी होत्या इत्यादी माहिती देण्यात आलेली आहे.
ही पुस्तक वस्रोद्योगातील जाणकार व्यक्तींसाठी नसून नविन आणि जिज्ञासू व्यक्तीसाठी आहे असेही या पुस्तकात सांगण्यात आलेले आहे.
त्यानंतर आपण "औद्योगिक अपशिष्टांवरील उपचारासंबंधी मूलभूत ज्ञान आणि प्रथा" या पुस्तकामध्ये औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या waste बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. ही पुस्तक पाणी दूषित होऊ नये तसेच औद्योगिक क्षेत्रामुळे होणारे इतर अपव्यय कसे टाळावेत याच्यावर आधारित असणार आहे.
"कापडावरील रासायनिक प्रक्रिया" हे रा. शं. भागवत यांच्याकडून लिहिण्यात आलेलं पुस्तक आहे. यामध्ये आपल्याला कापड उद्योगातील कापडावर केल्या जाणाऱ्या रासायनिक प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
"महाराष्ट्राची सागरी मत्ससंपत्ती" या नावावरूनच आपल्या लक्षात आले असेल की, हे पुस्तक कशाबद्दल माहिती देणारे असणार आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणते मासे पकडले जाऊ शकतात याबद्दल माहिती आहे.
Download दुर्मिळ मराठी पुस्तके
- सुती वस्रोद्योग
- औद्योगिक अपशिष्टांवरील उपचारासंबंधी मूलभूत ज्ञान आणि प्रथा
- कापडावरील रासायनिक प्रक्रिया
- महाराष्ट्राची सागरी मत्ससंपत्ती
वरील मराठी भाषेतील दुर्मिळ पुस्तके आपल्याला आवडतील असी आशा करतो आणि पुढे अजून अशी काही पुस्तके शेयर करणार आहे, त्यामुळे आमच्या वेबसाईटला भेट देत राहा.
0 टिप्पण्या