पुढे ढकलण्यात आलेली MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार या तारखेला; नविन सुधारित वेळापत्रक

MPSC Rajyaseva New Time Table

2 जानेवारीला होणारी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षेसाठी नविन सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

आयोगाकडून बदललेल्या वेळापत्रकाची माहिती ट्विटरवर ट्विट करून देण्यात आलेली आहे.

कोरोनामुळे शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिध्द झाल्यामुळे कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना परीक्षा देता यावी यासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती.

नविन आलेल्या वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा 23 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना नव्याने प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येतील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या