YCMOU Migration Certificate ? कधी गरज भासते आणि कसं मिळेल...

YCMOU Migration Information

What is Migration Certificate

तसं पाहता Migration Certificate म्हणजेच स्थलांतर प्रमाणपत्र हे फक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच लागतं असं नाही, इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सुद्धा स्थलांतर प्रमाणपत्राची आवश्यकता भासू सकते.

आता आधी Migration Certificate काय आहे आणि त्याचा उपयोग काय हे आपण समजून घेऊया. Migration Certificate हे एक असे प्रमाणपत्र आहे जे प्रवेशाच्या वेळेस आवश्यक असते. ते कसे हे नीट समजून घेऊया, जेव्हा आपण एक विद्यापीठ सोडून दुसऱ्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतो त्या वेळेस या प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

समजा आपण सध्या YCMOU मध्ये B.A पूर्ण केले आणि आता आपल्याला शावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून M.A करायचे आहे, तर येथे आपल्याला पुणे विद्यापीठात YCMOU चं Migration जमा करण्याची आवश्यकता भासेल.

आता Migration Certificate कसं  त्याविषयी माहिती घेऊया.

YCMOU Migration मिळविण्यासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरण्याआधी आपल्याला कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून Finance Officer, Y.C.M. Open University या नावाने रु. 400/- चा DD काढावा लागेल.

YCMOU Migration Online Form

त्यानंतर वरील लिंकवरून वेबसाईटला भेट द्या आणि आवश्यक तेवढी सर्व माहिती भरून फॉर्मची प्रिंट काढून घ्या. फॉर्मची प्रिंट आणि आवश्यक ती सर्व आवश्यक कागदपत्रे (आपल्या शेवटच्या शिक्षणक्रमाची गुणपत्रिकांच्या झेरोक्स प्रती) आपल्याला खालील पत्त्यावर पाठवायची आहेत.

पोस्टाने फॉर्म पाठविण्याचा पत्ता : मायग्रेशन कक्ष, परिक्षा विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक ४२२२२२

फॉर्म पाठविल्यानंतर १५-२० दिवसांत Migration Certificate पोस्टाने आपल्या पत्त्यावर येईल.