Mumbai University विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरु

मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन

लॉकडाऊनमुळे बंद कराव्या लागलेल्या शाळा-कॉलेज आणि त्यानंतर परिक्षेसंदर्भात आलेल्या सुचनांमुळे विद्यार्थी तसेच पालकही गोंधळात पडले आहेत. पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्याच परीक्षा घेण्यात याव्या असे UGC कडून संगण्यात आले होते. त्यामुळे या परीक्षा कधी होणार तसेच पुढील वर्गातील प्रवेशाबाबत अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात तयार होत आहेत. 


विद्यार्थ्यांचा गोंधळ कमी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडून हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे. या हेल्पलाईन वर विद्यार्थी नंबर व ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. 


या हेल्पलाईनच्या माध्यमातून विद्यार्थी परीक्षा तसेच पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन घेऊ शकतात. विद्यार्थी खालील हेल्पलाईन वर संपर्क करू शकतात.
+91 9619034634, +91 9373700797
examhelpline@mu.ac.in 

मुंबई विद्यापीठाच्या मुक्त शिक्षणाचे विद्यार्थ्यांनी खालील ई-मेलच्या माध्यमातून संपर्क करावा.
info@idol.mu.ac.in

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या