YouTube कडून विद्यार्थ्यांसाठी नविन सुविधा

YouTube कडून YouTube Learning Destination लाँच

कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांना घरात बसण्यास भाग पाडले आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आलेले आहेत, क्लासेसही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. म्हणून YouTube India कडून विद्यार्थ्यांसाठी नवीन सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.


शाळा-कॉलेज मधील अनेक विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणावरून ऑनलाईन शिकण्यास सुरुवात केलेली आहे. अनेक शिक्षक Video Conferencing App च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चरही घेत आहेत. अभ्यासामध्ये जास्त मोठा अंतर पडू नये म्हणून अनेक विद्यार्थी ऑनलाईन कोर्सेसही जॉईन करत आहेत.


युट्युब कडून YouTube Learning Destination ही सुविधा सुरू केली आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी माहितीपर Videos उपलब्ध असणार आहेत. नवीन कला शिकण्यासाठी, शालेय विषयाशी संबंधित विविध गोष्टी तसेच कलात्मक गोष्टी, फोटोग्राफी किंवा यासारख्या इतर गोष्टी शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ही सुविधा पूर्णपणे फ्री असणार आहे.

YouTube Learning Destination वरील सर्व videos सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. परंतु लवकरच मराठी आणि इतर भाषेतील video ही येथे उपलब्ध होतील. याचा सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिकण्याची इच्छा असणाऱ्यांनी नक्की वापर करावा.

तसेच आपण आमच्या Ajay Chaitya EduTech हा चॅनल Subscribe करून Facebook व Instagram वरही follow करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या