येथे करा ऑनलाईन अभ्यास | अभ्यासाचे ऑनलाईन पर्याय

स्वयं प्रभा : अभ्यासाचे ऑनलाईन माध्यम

सध्या कोरोनामुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झालेले आहे. त्यामुळे इतर कामे आणि पर्यायाने अभ्यासही घरीच करावा लागत आहे. शाळा-कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा विचार केला तर काही जणांच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या तर काही जणांचा अभ्यासक्रम पूर्णच झाला नाही. लॉकडाऊनमूळे परीक्षा कधी होतील हे सांगता येणार नाही परंतु परीक्षा होणार आहेत या विचाराने अभ्यास चालू ठेवणे कधीही चांगलेच.
आपल्याला ज्या विषयांच्या परीक्षा द्यायच्या आहेत त्या विषयांचा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करू शकतो. आपल्याकडे असणाऱ्या अभ्यास साहित्याचा वापर करून काही संकल्पना किंवा विषय समजत नसेल तर त्या विषयी ऑनलाईन माहिती आपल्याला शोधता येईल. अनेक शैक्षणिक वेबसाईट्स आणि YouTube video ची ही मदत आपल्याला घेता येईल.

पुढील शिक्षण, नोकरी किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी म्हणून वाचन करणे एक चांगली गोष्ट आहे. Online अभ्यासासाठी मागील एका पोस्ट मध्ये National Digital Library या भारतातील सर्वात मोठ्या वाचनालयाबद्दल माहिती घेतली होती, तर या पोस्ट मध्ये स्वयं प्रभा विषयी माहिती घेणार आहोत.
स्वयं प्रभा ही भारत सरकार कडून जुलै 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली सुविधा आहे. स्वयं प्रभा हा 32 मोफत चॅनल्सचा समूह आहे. या चॅनल्सचे प्रक्षेपण GSAT-15 या उपग्रहाच्या साहाय्याने केले जाते. या चॅनल्सवर दररोज चार तासांचे नवीन अभ्याससाहित्य पाच वेळा प्रक्षेपित केले जाते. विद्यार्थ्यांना आपल्या सोयीनुसार कधीही याचा वापर करता येईल. यामध्ये देशातील काही नामांकित शैक्षणिक संस्थांकडून या चॅनल्सचे अभ्याससाहित्य तयार करण्यात येते.

हे पण बघा : डाऊनलोड करा YCMOU अभ्यासक्रमाची पुस्तके

यामध्ये उच्च शिक्षण - पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि मानव्य शास्त्र, मेडिकल, कृषी इ. विद्याशाखांमधील पाठ्यक्रमावर आधारित अभ्यास साहित्य उपलब्ध आहे. या अभ्यास साहित्यावर आधारित अभ्यासक्रम SWAYAM (Study Web of Active Learning by Young and Aspiring Minds) द्वारे पूर्ण करून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील मिळविता येते.

वेबसाईटवर प्रत्येक चॅनल चं वेळापत्रक देण्यात आलेलं असतं त्यानुसार आपण चॅनलवर कार्यक्रम बघू शकता. स्वयं प्रभा चं App सुद्धा उपलब्ध आहे ते आपण डाऊनलोड करू शकता.

पोस्ट आवडल्यास शेयर करा आणि आपल्याला जर आमच्या लिहिलेल्या पोस्ट्स आवडत असतील तर आमच्या ब्लॉगला भेट देत राहा, आम्ही प्रत्येक दोन दिवसांत एक पोस्ट ब्लॉगवर टाकत असतो. आमचा Ajay Chaitya EduTech हा युट्युब चॅनल Subscribe करून घ्या, चॅनलवर आपल्याला Technology आणि शिक्षणासी संबंधित विविध प्रकारची माहिती video च्या स्वरुपात बघता येईल सोबतच Facebook आणि Instagram वर सुद्धा follow करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या