केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी नवीन मोबाईल ऍप | पिकांची विक्री होणार सोपी

शेतकऱ्यांच्या मदतीला किसान रथ ऍप

देशात असणाऱ्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय बंद आहेत परंतु सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल विकण्यास अडचणी निर्माण होत आहे. शेतकऱ्यांचा माल विकता यावा या उद्देशाने केंद्र सरकारने किसान रथ नावाचे मोबाईल ऍप लाँच केले आहे. या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांना मालाची खरेदी-विक्री करणे सोपे होणार आहे.


ऍप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे तेथून डाऊनलोड करता येईल. डाऊनलोड केल्यानंतर आपले नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर इत्यादी माहिती भरून रजिस्टर करावे लागेल. रजिस्टर केल्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करावे लागेल. किसान रथ ऍप गुजराती, मराठी, पंजाबी, तमिळ, कन्नड आणि तेलगू या भाषेत उपलब्ध आहे.


केंद्र सरकारने किसान रथ ऍपला लॉकडाऊनच्या काळात लाँच केले असले तरी लॉकडाऊन संपल्यानंतरही हा ऍप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या ऍपच्या माध्यमातून शेतकरी फळे, भाजीपाला, धान्य विकू शकणार आहेत. किसान रथ ऍप शेतकरी आणि व्यापाऱ्यांना देशभरातील कृषी-बाजारपर्यंत पोहोचण्यास मदत करेल.

शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हा ऍप खूप उपयुक्त आहे त्यामुळे याचा नक्की वापर करा. ऍप वापरासंबंधी काही प्रश्न असतील जसे की रजिस्ट्रेशन प्रक्रिया किंवा यासारखे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट करून आम्हाला कळवा आम्ही आपल्या कमेंटला नक्की उत्तर देऊ. ही पोस्ट शेयर करून आपल्यासारख्या इतर वाचकांपर्यंत पोहोचवा.


Mobile, Computer, Apps, Internet, शिक्षण इ. संबंधित विविध videos साठी आपण आमच्या YouTube Channel ला Subscribe करू शकता तसेच Facebook आणि Instragram वरही follow करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या