JEE Main 2020 परीक्षा कधी होणार ?

JEE Main परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात

या वर्षी JEE Main ची परीक्षा 5, 7, 9 आणि 11 एप्रिल रोजी होणार होती परंतु कोरोना व्हायरस आणि त्यामुळे घोषित केलेल्या लॉकडाऊन मुळे ही परीक्षा अधिकच लांबणीवर पडली आहे. NTA म्हणजेच National Testing Agency कडून घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या आहेत.

JEE च्या वेबसाईट वर असणाऱ्या माहितीनुसार ही परीक्षा आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येईल पण तरीही परीक्षेची दिनांक अजून देण्यात आलेली नाही. JEE Main च्या परिपत्रकानुसार परीक्षेची दिनांक नंतर कळवण्यात येईल. परीक्षेचे प्रवेशपत्र 15 एप्रिलच्या नंतर वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. 15 एप्रिल पर्यंत परिस्थिती कशी असेल याच्यावर पुढील प्रक्रिया अवलंबून असणार आहे. आवश्यक त्या सूचना वेबसाईटवर देण्यात येतील. 
ही परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा NTA ने आधीच केली होती. त्यावेळेस लॉकडाऊनची सुद्धा घोषणा झालेली नव्हती पण देशामध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा परिणाम दिसून येत होता.

एकंदरीत परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असल्याने विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासासाठी जास्त वेळ मिळणार नाही. परीक्षेची दिनांक निश्चीत होत नाही तोपर्यंत JEE Main परीक्षेचा अभ्यास पूर्ण करून घ्या. परीक्षेसाठी आणि त्या अनुशंगाने अभ्यासासाठी विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या