JEE चा अभ्यास करा ऑनलाईन | भारतातील सर्वात मोठी Online Library

India's Biggest Online Library

देशात असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर JEE Main आणि JEE Advance या दोन्ही परीक्षा लांबणीवर पडलेल्या आहेत. या परीक्षा आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासासाठी जास्त वेळ मिळालेला आहे. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर पडता येणार नाही आणि म्हणूनच घरी बसून ऑनलाईन अभ्यास करता यावा यासाठी IIT खरगपूरने Preparation modules तयार केलेले आहेत आणि ते national digital library वर उपलब्ध करून दिले आहेत. याचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना NDLI च्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल. हे रजिस्ट्रेशन निशुल्क म्हणजेच फ्री असणार आहे.
National Digital Library ही भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन Library आहे. ही IIT खरगपूरच्या अंतर्गत येते. या Library चा कुणालाही वापर करता येऊ शकतो. 

JEE Main आणि JEE Advanced यासारख्या परीक्षांसाठी अनेक विद्यार्थी खाजगी क्लासेस वर अवलंबून असतात तर काही विद्यार्थी सेल्फ स्टडी सुद्धा करत असतात. लॉकडाऊनच्या या काळामध्ये सर्व क्लासेस बंद आहेत म्हणून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू राहावा यादृष्टीने या संस्थेने हा ऑनलाईन अभ्यास उपलब्ध करून दिलेला आहे.

हे पण बघा : कोरोनाच्या नावाने मोबाईल मधील माहिती चोरली जाऊ शकते.

आपण या Library चा वापर वेबसाईट किंवा त्यांच्या App वरून सुद्धा करू शकता. https://www.ndl.gov.in/ ही या Library ची वेबसाईट आहे. आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल नंतर आपण त्याचा कधीही वापर करू शकता.

हे पण बघा : कोरोनानंतर सारी ! काय आहे सारी आजार....

ही Library अभ्यास करणारे किंवा वचनाची आवड असणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने तर या Library चा नक्की वापर करावा. 

Website किंवा App वरून रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. रजिस्ट्रेशन करताना काही अडचणी येत असतील किंवा रजिस्ट्रेशन कसे करावे किंवा असेच इतर काही प्रश्न निर्माण होत असतील तर कमेंट करून सांगा. आम्ही आपल्यासाठी आमच्या Ajay Chaitya EduTech या YouTube channel वर याविषयीचा video उपलब्ध करून देऊ. 

या Library विषयी आपल्या मित्रांना तसेच गरजू व्यक्तींपर्यंत माहिती पोहोचवा. आमची पोस्ट सुद्धा आपण शेयर करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या