बारावीची नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके ऑनलाईन उपलब्ध

विद्यार्थ्यांना पुस्तके डाऊनलोड करता येणार

कोरोना आजाराला रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका बारावीच्या पुस्तकांनाही बसणार आहे. राज्य मंडळाने बारावीच्या अभ्यासक्रमात येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2020 - 21 मध्ये बदल केलेला आहे. बारावीची पुस्तके बालभारती कडून छापली जातात. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अधिच पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत असतात. विद्यार्थ्यांना पुस्तके वेळेवर मिळावीत म्हणून बालभारतीने खूप प्रयत्न केले परंतु लोकडाऊनमुळे ही पुस्तके आता विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्यास अडचण निर्माण होऊ शकते.


पुस्तके उशिरा उपलब्ध होणार असल्याने बालभारतीने ही पुस्तके त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहेत. ही पुस्तके PDF स्वरूपात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना ती आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा डाउनलोड करून घेता येतील. 
पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी काय करावे लागेल ते खालील Video मध्ये बघा आणि इतर शैक्षणिक तसेच Tech Videos साठी आमचा Ajay Chaitya EduTech हा युट्युब चॅनल Subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या